Battery Favarni Pump: बॅटरी चलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Battery Favarni Pump: नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी यंत्र (Battery Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया ऑनलाईन अर्ज कसा करायचा.

Battery Favarni Pump

1. आधार क्रमांक आधार कार्डशी संलग्न करा

सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. हे करून घेतल्याशिवाय पुढील प्रोसेस सुरू करता येणार नाही.

2. महाडीबीटी पोर्टलला भेट द्या

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login महा डीबीटी पोर्टल संकेतस्थळाला भेट द्या. “शेतकरी योजना” हा पर्याय निवडा. यामध्ये आपल्याला विविध योजनांची माहिती मिळेल.

3. अर्ज करण्याचे साधन

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी योग्य साधन निवडा.

सर्व मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार; लेक लाडकी योजना सुरु, लगेच येथे करा अर्ज Lek Ladki Yojana
सर्व मुलींना 1 लाख 1 हजार रुपये मिळणार; लेक लाडकी योजना सुरु, लगेच येथे करा अर्ज Lek Ladki Yojana

4. आधार क्रमांक प्रमाणित करा

“वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक प्रमाणित करावा. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी.

5. अर्ज करा

“पुढे अर्ज करा” अशी लिंक शोधा आणि क्लिक करा. “कृषी यांत्रिकीकरण” या पर्यायासमोर दिसत असलेल्या “बाबी निवडा” या पर्यायावर क्लिक करा. अर्ज उघडल्यानंतर माहिती भरा, मुख्य घटकांत “कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य” हा पर्याय निवडा. तपशीलांत “मनुष्यचलीत औजारे” हा पर्याय निवडा. यंत्रसामग्री औजारांत “पीक सरंक्षण औजारे” हा पर्याय निवडा. मशीनचा प्रकारांत “बॅटरी संचलित फवारणी पंप (कापूस/गळितधान्य)” Battery Favarni Pump प्रकार निवडा.

6. अटी आणि शर्थी मान्य करा

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी चौकटीमध्ये टिक करा. “जतन करा” या बटनावर क्लिक करा. पुढे अर्ज करायचा असल्यास Yes, अन्यथा No वर क्लिक करा. अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून OK बटनावर क्लिक करा.

7. पेमेंट प्रक्रिया

२३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे. Make Payment या बटनावर क्लिक करा. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

Mudra Loan
प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्जासाठी अर्ज कसा करावा? व्याजदर, पात्रता, अर्ज प्रक्रिया येथे पहा! Pradhan Mantri Mudra Loan Apply 2025 (Pmmy)

अर्जाचे स्टेटस पहा

महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात. निवड झाल्यास कागदपत्रे अपलोड करून द्या. अर्जाचे स्टेटस बघण्यासाठी “मी अर्ज केलेल्या बाबी” पर्यायावर क्लिक करा. “छाननी अंतर्गत अर्ज” या पर्यायावर क्लिक करा. अर्जाचे तपशील आणि पोहोच पावती डाउनलोड करा.

अधिक माहिती आणि संपर्क

कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in. महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800.

बॅटरी संचलित फवारणी पंप शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सुरु, महाडीबीटी वर “या” तारखे अगोदर अर्ज करा |battery operated spray pump subsidy Yojana

Leave a Comment