कंडक्टरने लगावली प्रवाशाच्या कानशिलात, ह्यांना अधिकार दिला कोणी? बेस्ट बसमधील धक्कादायक प्रकार समोर Mumbai Best Bus Conductor Viral Video

Mumbai Best Bus Conductor Viral Video: अनेक मुंबईकर रोज ट्रेनप्रमाणे बेस्ट बसने प्रवास करत असतात; पण मुंबईत बेस्ट बसने प्रवास करताना कंडक्टरबरोबर प्रवाशांचे सुट्या पैशांवरून वा अन्य काही कारणांवरून वाद होत असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर एका भलत्याच कारणावरून प्रवासी आणि बेस्ट बस कंडक्टरमध्ये वाद झाल्याची घटना घडलेली आहेत. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झालेले आहे, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आहे.

कोणत्या तरी कारणावरून प्रवासी आणि बस कंडक्टरमध्ये वाद झालेला आहे. त्यावेळी प्रवाशाने त्या वादाचा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला. त्यामुळे राग आल्यामुळे कंडक्टरने बडबड करीत थेट प्रवाशाच्या कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना घडलेली आहेत.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

ही घटना मुंबईतील बेस्ट बस क्रमांक A-382 मध्ये घडली आहेत, ही बस अनुशक्ती नगरची आहेत, अशी माहिती समोर आलेली आहेत. मात्र,अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कंडक्टरला प्रवाशावर हात उचलण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवाल उपस्थित केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद

व्हायरल व्हिडीओत प्रवासी आणि कंडक्टरमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचे स्पष्ट दिसते. यावेळी कंडक्टर ‘तुला मी बसमधून उतर, असे बोलतच नाहीत, असे प्रवाशाला सुनावतो आणि बसच्या मागच्या दरवाजापर्यंत येताना दिसत आहे.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करताना अन्य प्रवासी पण का उतरायचं, अशी कंडक्टरला वारंवार विचारणा करत आहे. यावेळी कंडक्टर काहीच उत्तर देत नाही म्हणून तो कंडक्टरला हात लावून पुन्हा तोच सवाल करतोय. त्यावर कंडक्टर भडकतो आणि पुढच्याच क्षणी प्रवाशाच्या कानशिलात लगावत आहे.

वर व्हिडीओ शूट करू नकोस, अशी धमकी देत मोबाईल ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यावर अन्य प्रवासी मध्यस्थी करून कंडक्टरला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण, कंडक्टर काही शांत होत नाही. तो अन्य प्रवाशांनाच सांगतो की, तुम्हाला काय करायचं ते करा.

तिकीट असूनही कंडक्टर अशा प्रकारे प्रवाशांबरोबर उद्धट बोलत होतात, असा खुलासा दुसरा प्रवासी करताना दिसतोय. त्यावरही कंडक्टर भडकतो आणि तो “बडबड करु नकोस शांत राहा’ असे ओरडून प्रवाशाला गप्प करण्याचा प्रयत्न करतो.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment