या जिल्ह्यातील पिक विमा जमा; चेक करा अखेर प्रतीक्षा संपली Crop Insurance List

राज्यात मागील तीन ते चार महिन्यापासून पिक विमा आगरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पिक विमा जमा होणार आहे. 335.90 कोटी रुपयांची अग्रीम मंजूर करण्यात आलेले आहेत.

अखिल शासनाने पिक विमा हप्ता मंजूर केल्यामुळे रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सात लाख 63 हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप, ज्वारी बाजरी या पिकांसाठी एकूण 5 लाख 24 हजार 267 हेक्टरचा पिक विमा उतरवलेला होता. सोयाबीन कापूस तूर या पिकांसाठी पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

यामध्ये 7 लाख 14 हजार 161 शेतकऱ्यांनी या पिक विमा साठी नोंद केलेली होती. यामध्ये सोयाबीन 3 लाख 85 हजार हेक्टर कापूस 89 हजार हेक्टर तर 35 हजार 547 हेक्टर असा पिक विमा भरलेले क्षेत्र आहेत.

परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रीम जाहीर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तकादा लावण्यात आलेला होता. यामुळेच तो मंजूरही झालेला आहे. मात्र मागील तीन ते चार महिन्यापासून तो जमा करणे येत नसल्याने शेतकरी हे हैरण झालेले आहेत.

कंपनीचे संकेत, कृषी विभाग

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

पिक विमा बाबत कायम अवदासिन्य बाळगणाऱ्या कृषी विभागाला अजून देखील याबाबत काहीच माहिती नसल्याची दिसत आहे. प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिलेला आहे. मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रेमळ मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण होणार असल्याची माहिती दिलेली आहे.

10 एप्रिल पासून बँक खात्यात पैसे जमा

ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर झाली आहे. त्यांच्या खात्यावरती 10 एप्रिल पासून रक्कम जमा होत आहे. सोयाबीन उत्पादकांना 268.59 कोटी रुपये कापूस 53 कोटी तर तुरीसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

तुम्हाला पिक विमा मिळाला का? चेक कसा करायचा

  • आपला पिक विमा चेक करण्यासाठी प्रथम https://pmfby.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर “फार्मर कॉर्नर” ( Farmer Corner) या पर्यायावर क्लिक करून घ्यावे आणि लॉगिन फॉर्मर या पर्यायावर क्लिक करावे.
  • खाली आपला मोबाईल नंबर टाईप करावा. आणि त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • तुम्ही पिक विमा अर्ज नोंदणी करते वेळेस तुमच्या मोबाईल नंबर वरून केला असेल तर तुम्हाला तिथे तुमचा आधार कार्ड नंबर नमूद करावा लागतो.
  • त्यानंतर खाली तुम्हाला ओटीपी येतो तो तेथे टाईप करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर “वर्ष निवडा” आणि “हंगाम निवडा” त्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेल्या सर्व पॉलिसी दिसून जातील.
  • पुढे तुम्हाला पॉलिसी ची माहिती पाहिजे आहे. त्यावरती क्लिक करावे आणि तुम्हाला त्या पॉलिसीची क्लेम स्थिती दिसून जाते.

यानंतर “View Status” या वरती क्लिक करून तुम्हाला पिक विमा ची पैसे मिळाले आहेत का? मिळाले तर किती मिळाले? आणि कोणत्या पिकासाठी मिळाले? आणि किती तारखेला मिळाले? याची संपूर्ण सविस्तर माहिती दिसते.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

मित्रांनो अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून पिक विमा जमा झाला आहे का? चेक करू शकतो. आणि जर ही माहिती तुम्हाला समजली असेल तर आपल्या मित्रांना तसेच तुमच्या इतर मोबाईल मध्ये व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment