Crop Insurance Latest Updates : मागील खरिपातील पीकविमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळेना, ३ हजार कोटींची प्रलंबित रक्कम

Crop Insurance Latest Updates : २०२३ साली खरिपात लागवड केलेल्या पिकांच्या विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. संबंधित विमा कंपन्यांकडे २ हजार ८०० कोटी रुपये प्रलंबित असल्याची स्थिती आहे.

Crop Insurance Latest Updates

पीकविमा: मागील खरिपातील म्हणजे २०२३ च्या खरिपात लागवड केलेल्या पिकांचा विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील विविध विभागांसाठी नेमलेल्या विमा कंपन्यांकडे अजूनही २ हजार ८०० कोटी रुपये प्रलंबित आहेत.


दरम्यान, सरकारने लागू केलेल्या एक रुपयांत पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला होता. परंतु, या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसाच्या अनियमिततेमुळे, पावसातील २१ दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या खंडामुळे, तसेच मातीतील कमी ओलाव्यामुळे मोठे नुकसान झाले. विविध कारणांनी ट्रिगर होऊनही आणि पिकांचे पंचनामे पार पडूनही, विमा कंपन्यांनी अद्याप शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही.


(Crop Insurance Latest Updates) कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार, राज्यात ७ हजार
३२२ कोटी एवढी नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यातील ४ हजार ५२४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर २ हजार ७९८ कोटी ४३ लाख रुपये प्रलंबित आहेत. या रकमेपैकी सर्वाधिक रक्कम ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे प्रलंबित आहे. निश्चित नुकसान भरपाईच्या ३ हजार ३०९ कोटी रुपयांपैकी, या कंपनीने केवळ ८०२ कोटी रुपये वितरित केले आहेत, तर २ हजार ५०७ कोटी रुपये प्रलंबितआहेत.


भारतीय कृषी विमा कंपनीने निश्चित नुकसान भरपाईच्या ९२४ कोटी रुपयांपैकी केवळ ७०४ कोटी रुपये वितरित केले आहेत, तर २१९ कोटी रुपये प्रलंबित आहेत. एक वर्ष उलटून गेले तरीही मागील हंगामातील विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, विमा कंपन्या मोठ्या नफ्यात असताना, सरकारची एक रुपयांत पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे की फक्त विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

Crop Insurance 2023 : पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम 31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार!

Leave a Comment