Gold Price Today: गेल्या 48 तासांमध्ये सोन्याचे भाव सर्वात मोठी 8 हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात सध्या कमालीचा चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 8 हजार रुपयांची सर्वात मोठी घसरण झाली आहे. भारत पाकिस्तान युद्धानंतर सोने 4,000 रुपयांनी घसरलेले आणि सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 8 हजार रुपयांनी खाली आलेले आहे. रविवारी (11 मे) रोजी सोन्याचा भाव 96 हजार 700 रुपये होता तर आता आणखी 4 हजार रुपयांनी घसरलेला असून सध्या प्रति 10 ग्राम सोन्याचे भाव 92 हजार 910 वर आलेले आहेत.
Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिका आणि चीनच्या तयारी कराच्या झालेल्या चर्चा नंतर सोन्याच्या किमतीमध्ये मोठा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यामध्ये 1 लाखाच्या घरात मुसंडी मारणचे देखील ग्राहकांना दिसून आलेले होते. सोन्याचा उतरता भाव पाहता अनेक जण सध्या सोने खरेदी करू लागले आहेत.
आज सोन्याचा भाव किती आहे?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार 13 मे रोजी मुंबई – पुण्याच्या सराफा बाजार मध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत ही 92 हजार 300 असल्याचे पाहायला मिळत आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम साठी 85 हजार 210 रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 1 लाख 500 रुपये असणारा सोन्याचा भाव रविवारी 96 हजार रुपयांवर आला तर सोमवारी आणखी 4,000 रुपयांनी घसरलेला असून 10 ग्रॅम सोन्याचे दर 92,550– 93,000 शहरानुसार असल्याचे पाहायला मिळत आहे.
10 ग्रॅम सोन्याचा लाईव्ह बाजार भाव पहा Gold Price Today
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण कशी काय?
अमेरिकेच्या डायरेक्ट धोरणानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खळबळ उडाल होती. जगभरातील शेअर मार्केट गडगडल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंत सर्वाधिक भाव वाढल्याचे पाहायला मिळाले होते. देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढलेल्या होत्या त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला सुरुवात झालेली होती.
भारत पाकिस्तान संघर्ष आणि बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरण निर्णयामुळे मागच्या आठवड्यात दोन्हीही धातूच्या किमतीत लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आलेले होते. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर मुळे शेजारील देशांमधील तणाव वाढलेला होता. ज्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढलेली होती.
एकीकडे भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती निवडण्याची स्थिती असतानाच अमेरिकेने चीनमधील वस्तूंवरील आयात शुल्क 145% वरून कमी करून कमी करून 30% पर्यंत कमी केले आहे. हे बदल 90 दिवसांसाठीच करण्यात आलेले आहेत. चीनने देखील अमेरिकेच्या वस्तू 125 टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत 90 दिवसांसाठी कमी केलेले आहेत. या निर्णयाचा परिणाम सध्या सोन्याच्या बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे.