Gold Price Crash : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोन्याचा भाव सध्या उच्चांकावर पोचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदीसाठी जास्त पैसे मजावी लागत आहेत शेअर बाजारांमधील घसल्याने मूळ सुद्धा गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्याचाच परिणाम सोन्याच्या दरामध्ये आणखी तेजी दिसून येत आहे. पण आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी ही बातमी पुढे आलेली आहे.
सोन्याचे भावात होणार मोठी घसरण; Gold Price
येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 38% पर्यंत घसरल होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आलेला आहे. अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर्म मॉर्निंगस्टरचे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याच्या दर प्रति औस 1820 डॉलर पर्यंत घसरण होऊ शकतात. सध्या पोहोचलेल्या उच्चाकी दलांपासून हा दर 38 टक्क्याने खाली दर्शवण्यात आला आहे. म्हणजे सोन्याच्या दरामध्ये 38% पर्यंतचे घसरण होऊ शकते. यासंदर्भात महिने कंट्रोल ने अधिक माहिती दिलेली आहे.
सोन्याचे भाव ५५४९६ रुपये होणार
सोन्याचा दरामध्ये अशा प्रकारे घसरण झाली तर सोन्याचा भाव भारतामध्ये प्रति तोळा 55,496 रुपये इतका होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला आजच्या किमतीच्या तुलनेमध्ये तब्बल 36 ते 37 हजार रुपयांनी स्वस्त सोनं खरेदी करता येऊ शकते.
“या कारणांमुळे” सोन्याच्या भावात घसरण
सध्या खूप मोठ्या प्रमाणावर तज्ञांकडून सोन्याच्या भावांमध्ये घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे अनेक देशांमध्ये सध्या सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू आहे. अनेक देश मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्पादन वाढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय जुन्या सोन्याचे ही मोठ्या प्रमाणावर पुनर्वापर केले जात आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या सोन्याचे प्रमाण आणखी वाढत आहे. पुरवठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे किमतीवर दबाव निर्माण होऊन सोने स्वस्त होऊ शकते. अशा प्रकारची माहिती देण्यात येत आहे.