Hawaman Andaj Today: राज्यभर आज १००४ हेक्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. तसेच उद्या 12 जून (गुरुवार) रोजी आणखी कमी होऊन 1000 हे हेक्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, तसेच मराठवाड्यात सह कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 12 जून 2025 पासून कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.
पुढील 3-4 दिवसात या भागात मुसळधार पाऊस; रामचंद्र साबळे
रायगड, पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगटा सह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. अशा प्रकारच्या अंदाज रामचंद्र साबळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.
रामचंद्र साबळे यांच्या माहितीनुसार,
आता पावसाचा खंड संपलेला असून, राज्यभरात मान्सूनचे पुनरागमन होत असून संपूर्ण राज्यभर पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, सह विदर्भामध्ये देखील 12 जून 2015 ला सुरुवात होणार आहे. 15 जून 2025 नंतर पुरेशी ओल झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नसल्याचे रामचंद्र साबळे यांच्या कडून संदेश देण्यात येत आहे.
यावर्षी 2025 मध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडणार आहे. यावर्षी देखील कमी कालावधीमध्ये जास्त पावसाची नोंद होईल. आणि काही काळ खंड अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असा अंदाज देण्यात येत आहे. आता जून महिन्यामधील पावसाचा खंड संपलेला आहे. मात्र जुलै 2025 मध्ये देखील अजून पावसाचा खंड निर्माण होऊ शकतो. असा अंदाज देखील रामचंद्र साबळे यांच्याकडून सांगण्यात येतो आहे.
पुढील तीन ते चार दिवसात राहणार याबाबत तज्ञ रामचंद्र साबळे यांनी हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे तो पाहण्यासाठी खाली व्हिडिओ नमूद केलेला आहे. पाहू शकता