IMD Weather Forecast 2025: नमस्कार मित्रांनो, सध्याला हवामान संस्था आणि हवामान तज्ञ यांच्याकडून नवीन नवीन हवामान अंदाज वर्तवण्यात येत आहे. आणि राज्यात देखील गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण पसरलेले असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात बहुतांशी जिल्ह्यास वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती देखील दिलेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेट नुसार मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि सोसायटीचा वारा या जगात अनेक ठिकाणी गारपटीचा अंदाज देखील वर्तवलेला आहे. तसेच उद्या 31 मार्च रोजी राज्यातील नंदुरबार नाशिक, धुळे ठाणे, पालघर, सातारा, सांगली, अहमदनगर, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जरी करण्यात आलेला आहेत. तसेच राज्यभरात उर्वरित महाराष्ट्र देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात १ एप्रिल रोजी ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर, जालना, जळगाव बुलढाणा, वाशिम अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याचे देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आणि हवामान खात्याने तीन एप्रिल पर्यंत राज्यभरात वादळीवाऱ्यासोबतच मुसळधार पावसाचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवणे गरजेचे आहे. आणि पाळीव प्राणी साठी देखील सुरक्षित निवारा असणे गरजेचे आहे. विजा चमकत असताना आणि ढगांचा गडगडात होत असताना झाडाखाली थांबू नये अशा प्रकारची आव्हान देखील सध्या हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.