मेंढपाळाचा मुलगा बनला IPS अधिकारी? गुर वळणारा पोरगा आज साहेब झाला! वाचा प्रेरणादायी यशकथा

IPS birdev done success story: 2025 च्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यांमधील कागल तालुक्यातील यमगे या छोट्याशा गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांनी मोठे यश मिळवलेले आहेत. त्यांना परीक्षेत 551 वा क्रमांक मिळाला असून आता ते IPS अधिकारी झालेला आहे. त्यांची यशकथा म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.

IPS birdev done success story

शैक्षणिक पार्श्वभूमी

बिरदेव यांचे शिक्षण एका अत्यंत साध्या कुटुंबातून सुरू झालेले. त्यांचे वडील मेंढपाळ म्हणून मेंढ्या राखण्याचे काम करत आहेत, तर त्यांची आई शेतमजुरी करते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असूनही त्यांनी शिक्षणाची नाळ सोडली नाहीत. जेव्हा upsc चा निकाल लागला त्यावेळेस बिरुदेव मेंढ्या संभाळत होता.

बिरुदेव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलेले तसेच माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली आहे.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

नोकरी आणि UPSC चा प्रवास

पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतीय टपाल विभागात ‘पोस्टमन’ म्हणून नोकरी स्वीकारलेली. मात्र त्यांच्या मनात UPSC ची तयारी करून काहीतरी मोठं करायचं होतं. मग त्यांनी UPSC साठी तयारी सुरू केलेली आणि पोस्टमनची नोकरी राजीनामा देऊन सोडली होती. पुढील अभ्यास कामासाठी त्यांनी दिल्लीमध्ये राहून 3 वेळा UPSC ची तयारी केली.

हलाखीची परिस्थिती होती, अनेक अडी अडचणी असूनही त्यांनी हार मानली नव्हती, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात अखेर 551 वा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले आहे.

.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

परिवाराची आणि गावाची भूमिका

UPSC चा निकाल लागल्यावर बिरदेव मेंढ्या राखत होता. त्यांना त्यांच्या मित्राकडून निकालाची बातमी कळलेली आणि त्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. सदरील बातमी गावकऱ्यांना समजल्या नंतर त्यांच्या घराजवळ ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं, गावकऱ्यांनी त्यांचं फेटा बांधून स्वागत केलेलं. आपला पोरगा IPS बनला हे पाहून आई-वडील अश्रू अनावर झालेले.

प्रेरणादायी संदेश

बिरदेव यांनी यश मिळवताना सांगितले आहे की,

“जिथे संधी नाही, तिथे मेहनतच आपल्याला पुढं घेऊन जात अहते. परिस्थिती कितीही कठीण असोत, जर निष्ठा आणि ध्येय असलं तर अशक्य काहीच नाहीत.”

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

ही कहाणी केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाहीत, तर अशा हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत, जे प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

बिरदेव यांचा प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment