Ladki Bahin Free Bhandi Set 2025: लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत भांडीसेट मिळणार अशी बातमी मागील काही दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये पसरतेय. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी विचारत आहेत की, या योजनेसाठी म्हणजेच की मोफत भांडी सेट साठी अर्ज कसा करायचा याचा लाभ आम्हाला मिळेल काय? नक्की या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आता पाहणार आहोत.
तर लाडक्या बहिणींना सर्वात आधी माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारे मोफत भांडी सेट देण्याची सुविधा नाहीत याचा अर्थ ही जी बातमी असेल विविध समाज माध्यमांमध्ये पसरत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाहीत. मोफत भांडी सेट कोणाला मिळतो तर मोफत भांडी सेट हा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिला जातोय
त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना विमा देखील दिला जातोय त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत देखील केली जाते त्यासोबतच विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या देखील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या केल्या जातात यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही.
लाडक्या बहिणीला मोफत सिलेंडर कधी?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचे राज्य सरकारच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या आधी जाहीर करण्यात आलेले होतेच आणि त्यातूनच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेने जन्म घेतलेला होता.
आता या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली होती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे सबसिडी असेल अथवा अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग देखील करण्यात आलेले होते. Ladki Bahin Free Bhandi Set 2025
विधानसभा निवडणुका नंतर मात्र गॅस सिलेंडरचे अनुदान असेल अथवा सबसिडी लाडक्या बहिणींना जमा झाली नाहीत आणि त्यामुळे त्या योजनेचे देखील काय झाले असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणी करत आहे. परंतु सरकारकडून याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही त्यामुळेच मोफत गॅस सिलेंडर सध्या कोणालाही मिळत नाही आहेत.
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्ता जमा झाला का नाही हे कसे पाहायचे असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत तर यासाठी तुम्हाला पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला मेसेज येणार आहेत.
बरेचदा बँकेमध्ये सर्व चा प्रॉब्लेम असल्यानंतर तुम्हाला मेसेज देखील सेंड केला जात नाहीत. अशावेळी तुम्ही त्या बँकेच्या टोल फ्री मेसेज चेक नंबर वरती देखील मिस कॉल देऊन त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स तपासू शकतात आणि त्याद्वारे तुम्हाला योजनेचा हप्ता जमा झाला आहे. की नाही हे समजणार आहे. हे देखील होत नसल्यास तुम्हाला तुमच्या बँकिंग एप्लीकेशन द्वारे बँकेचे स्टेटमेंट काढायचे आहे आणि त्या स्टेटमेंट मध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये जमा झाले आहेत की नाही. हे तुम्हाला लगेच समजणार आहे.
Ladki Bahin Free Bhandi Set 2025