Ladki Bahin Yojana April Installment: लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाहीत. ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) नेहमीच चर्चेत आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहे. आतापर्यंत महिलांना ९ हप्ते वितरीत करण्यात आलेले आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाहीत.
कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहे. या निकषात ज्या महिला पात्र आहेत. त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत. यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावेत. महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावेत. महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात. महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावीत, असे निकष आहे.
या सर्व निकषांमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहेत. ज्या महिला या निकषात बसत नाहीत तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. आतापर्यंत ९ लाख महिलांना योजनेतून बाद केलेले आहेत. मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीत. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झालेत त्यांना पैसे मिळणार नाही.
‘या’ महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही; यादी जाहीर चेक करा
एप्रिलचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana April Installment Date)
लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती आजून समोर आलेली नाहीत. परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहेत. अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाहीत. त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतोय.