राज्यातील महायुती सरकारची महत्वकांक्षी योजना लाडकी बहीण योजने बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना घडलेली आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावलेला आहेत. याप्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केलेली असून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातमधील असून तो फरार आहे.
राज्यातील सर्व सामान्य महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहेत. लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील महिलांना १५०० रुपये मिळतात. मात्र आता या योजनेत मोठी फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहेत. लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांचीच होती. आरोपी प्रतीक पटेलने त्याची काही माणसे या कामासाठी नेमलेली आणि बनावट बँक खाती उघडलेली. अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केलेली आहेत. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहेत.
याबाबत अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिलेली आहेत की, या खात्यांद्वारे कोट्यवधींचे व्यव्हार झालेले आहे. यात सायबर फ्रॉड, ब्लॅक मनी असे पैसे या खात्यात जमा केले जात होते.याप्रकरणी आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सांगितले की, आरोपी हे गरीब प्रवर्गातील निष्पाप लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांची बँक खाती सायबर गुन्हेगारांना विकत होते. आत्तापर्यंत तपासात २५०० बँक खाती उघडण्यात आल्याचे समोर आलेले आहेत. यातील काही खाती सायबर गुन्हेगारांना आणि मनी लाँड्रिंग करणाऱ्यांना विकण्यात आलेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी गुजरातमधील सुरत शहरातून रॅकेट चालवण्यात येत होते
पोलिसांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणामध्ये अविनाशसह फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत यांना अटक करण्यात आलेली आहेत. याबाबत फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केलेली होती. आरोपी श्रुती राऊतच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक बँकांचे पासबुक, बँकांशी संलग्न सिमकार्ड्स पोलिसांना मिळालेले आहेत. “आम्ही १०० हून अधिक खाती संबंधित बँकेला संपर्क साधून बंद केलेली आहे.