LPG Gas Cylinder Distributor Strike: सर्वसामान्यांना आता झटका बसू शकतो. कारण एलपीजी गॅस सिलेंडर मिळण्याबाबत ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे. आता एलपीजी गॅस पुरवठादार युनियन सरकारला संपाचा इशारा दिला आहे. महिन्यांमध्ये मागण्यांना मान्य केल्यावर संपावर जाण्याचा इशारा संघटने कडून देण्यात आलेला आहे. सरकारने नुकतेच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ केलेली आहे. आणि एकीकडे गॅस सिलेंडरच्या वाढते. किमतीमुळे सर्वसामान्य घरगुती बजेट वर परिणाम झालेला आहे. तसेच या वितरकांच्या पुढील संपामुळे सर्वसामान्यांना घरपोच गॅस सिलेंडर मिळण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि जर सरकारकडून मागण्या मान्य झाल्या तर हा संप होणार नाही. त्यामुळे आता हा वाद मिटवण्यासाठी सरकार पुढे काय पाऊल उचलते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
एलपीजी गॅस डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. शर्मा यांनी नुकतेच दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यामध्ये भोपाळ येथे झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये देशभरातील सदस्य सहभागी झालेले होते आणि एक मात्र ठराव मंजूर करण्यात देखील आलेला होता. कमिशन वाढवावा आणि जबरदस्तीने पाठवण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या तक्रारी थांबविण्यात याव्यात. अशा प्रमुख मागणे या प्रस्तावामध्ये करण्यात आलेले आहे.
मोफत 3 गॅस सिलेंडर मोफत; याच कुटुंबांना मिळणार..!
मागण्या काय आहेत?
गॅस सिलेंडर डीस्ट्रीब्युटर्स देण्यात येणार कमिशन हे खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या ऑपरेशनल कॉस्ट देखील भाग येत नाही. आणि सरकारने कमिशन वाढवून किमान दीडशे रुपये प्रति सिलेंडर करावे. अशी मागणी संघटनेकडन करण्यात येत आहे. इंधन कंपन्या मागणी शिवाय जबरदस्ती नवीन बिगर घरगुती सिलेंडर पाठवत आहेत. हे देखील चुकीचे आहेत. थांबणे आवश्यक आहे. आणि उज्वल योजनेच्या अंतर्गत गॅस वितरण मध्ये अडचणी येत आहेत. त्या दूर करण्याची गरज आहे असे त्यांचं म्हणणं आहे.
संघटना दीर्घकालीन संपावर जाणार?
या सर्व मुद्द्यावरती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला पत्र लिहिले असल्याची माहिती घेऊन यांनी स्वतः दिली आहे. सरकारने पुढील महिन्यामध्ये ठस पावलं उचलली नाही तर या संपावर जाण्याचा इशारा संघटनेतील आहे. त्यामुळे सर्वसामान्य सर्वाधिक त्रास होणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरती सरकार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.