LPG gas Cylinder Price : राज्यभरातील नागरिकांसह गृहिणींसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने आज एलपीजीच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्याची मोठी घोषणा केलेली आहे. गॅस सिलेंडर च्या आधारात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली असून याआधी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्का मध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
LPG gas Cylinder Price
8 एप्रिल (मंगळवार) पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तर उज्वला योजनेच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये देखील वाढ झाल्यामुळे गृहिणींचा आर्थिक बजेट कोलमाडणार असल्याचे पाहायला मिळत आहे. उज्वला योजनेच्या गॅस सिलेंडरची किंमत देखील 50 रुपयांनी वाढविण्यात आलेली आहे.
उज्वला योजनेच्या अंतर्गत सिलेंडर आता 500 रुपयां ऐवजी 550 रुपयांना मिळणार आहे. तर दुसरीकडे एलपीजी गॅस सेंटरच्या किमतीमध्ये देखील 50 रुपयांनी वाढलेल्या असल्यामुळे आता एलपीजी गॅस सिलेंडर 803 रुपयांऐवजी 853 रुपयांना मिळणार आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे.
गॅस सिलेंडच्या दरात मोठे बदल;
उज्वला योजना गॅस सिलिंडरचे दरही वाढले
उज्वला योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या गॅस मध्ये देखील वाढ झालेली आहे. उज्वला योजनेचा गॅस सिलेंडर अगोदर 500 रुपयांना मिळत होता. आता त्याची किंमत वाढून 550 झालेले असून हे दर आज पासून लागू झालेले आहेत. आणि अशा प्रकारे वाढ झाल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेले आहे.