दहावीचा निकाल; कोणता विभाग अव्वल? संपूर्ण निकाल पहा Maharashtra Board 10th Result 2025 Declared

Maharashtra Board 10th Result 2025 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली होती. आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 94.10% टक्के इतका लागलेला आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारलेली आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागलेला आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये सांगितली आहे. यंदा दहावीसाठी 15 लाख 46 हजार 679 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 55 हजार 477 विद्यार्थी पास झालेले आहे. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. तर 28 हजार 12 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यापैकी 22 हजार 518 विद्यार्थी पास झाले. तसेच 9 हजार 673 दिव्यांग विद्यार्थी नोंदणी केलेली होती. त्यापैकी 9 हजार 585 विद्यार्थी बसले. यातील 8 हजार 848 पास झालेले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.27 टक्के इतका लागला आहेत, असे शरद गोसावी यांनी म्हटले.

निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात
निराधार योजनेचे मानधन जमा होण्यास सुरुवात

या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण 16 लाख 10 हजार 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 15 लाख 98 हजार 553 विद्यार्थी बसलेले होते. 14 लाख 87 हजार 399 विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यांची टक्केवारी 93.03 टक्के आहे. फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10 टक्के आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल 93.04 टक्के आहे, असेही शरद गोसावींनी सांगितले.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला

हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा
हेक्टरी 20 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमचे नाव चेक करा

दहावीच्या निकालात कोकण विभागाने सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहेत. या विभागाचा निकाल तब्बल ९८.२८ टक्के इतका नोंदवला आहेत. तर, दुसरीकडे नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 90.87 टक्के इतका लागला आहेत. तसेच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लागला आहेत. या जिल्ह्याचा निकाल 99.32 टक्के इतका आहे. याउलट, गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी 83.67 टक्के नोंदवला गेला आहे.

विद्यार्थ्यांचे १५ मेपासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे

female police officer video Viral
तिने भररस्त्यात मर्यादा ओलांडली! महिला पोलिस अधिकाऱ्याचे: कपडे फाडले, केस ओढले अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल पहा

दहावी परीक्षेमध्ये सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या 3 संधी उपलब्ध होणार आहे. जून-जुलै 2025 मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज 15 मेपासून करता येणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केलेले आहे.

सरकारी योजना माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI