नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सहावा हप्ता जमा; मोबाईल वरून स्टेटस चेक करा Namo Shetkari Yojana Installment Beneficiary Status

Namo Shetkari Yojana Installment: महाराष्ट्र मधील एकूण 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनांच्या हप्त्यामुळे दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 6 वा हप्त्याची रक्कम 2,169 कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु यासाठी विलंब लागलेला होता. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला खूप मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा लागत असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता जमा करण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे.

मोबाईल वरून हप्ता कसा चेक करायचा?

राज्यभरातील शेतकरी हे घरबसल्या त्यांचा हप्ता जमा झालेला आहे. किंवा नाही हे आपल्या मोबाईल वरून सहजरीत्या चेक करू शकतात.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

Namo Shetkari Yojana Installment Beneficiary Status

हप्ता तपासण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करा

सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/ ही लिंक ओपन करावी आणि त्यानंतर लाल रंगांमधील “Beneficiary Status” (लाभार्थी स्थिती) या बटनावर क्लिक करावे. आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर कॅपचा कोड टाकून घ्यावा.

यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल तो भरून घ्यावा.
“Get Data” बटनावर क्लिक करावे. मग येथे तुम्हाला सर्व ची माहिती आपल्या स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यात तुम्हाला कोणत्या तारखेला कोणत्या बँकेमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत? तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत? आणि तुम्हाला हप्त मिळाले नसल्यास त्यामागे कोणते कारण आहे? अशा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून देशभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपये हे 3 समान हफ्त्यांमध्ये देण्यात येतात. प्रत्येक हप्ता 2000 रुपये असून तो लाभार्थ्यांच्या आधार तसेच डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो.

अशाप्रकारेच राज्य सरकारने राबवलेली नमो शेतकरी महासन्माननिधी योजना असून केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्यात येतात. आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही अडचणी येत असेल तर आपले सरकार सेवा केंद्रात संपर्क साधू शकता. किंवा सेतू केंद्रात भेट देऊ शकता.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार
पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2,000 रुपये ‘या’ दिवशी जमा होणार

Leave a Comment

Close VISIT MH SHETKARI