Old Land Record – जुने खाते उतारे, जुने सातबारा पहा मोबाईलवर अगदी मोफत
महाराष्ट्र शासनाने 1930 सालापासूनचे जुने सातबारा उतारे (Old Land Records) ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले आहे. यामुळे नागरिकांना आता घरबसल्या मोबाईलवर किंवा संगणकावर हे जुने रेकॉर्ड पाहता येत आहेत. या लेखात आपण या रेकॉर्ड्स ऑनलाइन कसे पाहायचे? हे सोप्या भाषेत समजून घेऊ.
Old Land Record
सातबारा पाहण्याची प्रक्रिया
सातबारा उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागते. ही वेबसाइट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink अशी आहे. यावर रजिस्ट्रेशन केल्यानंतरच जुने रेकॉर्ड्स पाहता येते.
रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्ही “Document Availability List” या पर्यायावर क्लिक करून कोणते जिल्हे आणि कागदपत्रे उपलब्ध आहे. याची माहिती घेऊ शकतात. ही यादी तपासून नंतरच पुढील प्रक्रिया करावीत.
रजिस्ट्रेशनसाठी “New User Registration” या बटणावर क्लिक करायचे. त्यानंतर एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये तुमचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख, पत्ता वगैरे माहिती भरावी लागते. युनिक लॉगिन आयडी निवडा आणि “Check Availability” बटणावर क्लिक करायचे. आयडी उपलब्ध असल्यास पासवर्ड सेट करून, कॅप्चा कोड भरून फॉर्म सबमिट करायचे.
Old Land Record ऑनलाइन सातबारा कसा पाहायचा?
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर मुख्य पानावर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे. लॉगिन केल्यानंतर “Basic Search” या पर्यायात जाऊन, आपल्या जमिनीचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा.
यानंतर “Document Type” मध्ये तुम्हाला पाहिजे असलेले कागदपत्र निवडा, जसे की सातबारा. नंतर Value बॉक्समध्ये गट नंबर, हिस्सा नंबर, ओल्ड सर्वे नंबर किंवा सर्वे नंबर टाकावा. “Search” बटणावर क्लिक केल्यावर संबंधित रेकॉर्ड्स दिसू लागतात.
सर्च केलेल्या रेकॉर्ड्समध्ये 1931 ते 2017 या कालावधीतील उतारे पाहायला मिळत आहेत. तुम्हाला पाहिजे असलेल्या वर्षाचा उतारा निवडून “Review Card” बटण क्लिक करायचे आणि रेकॉर्ड पाहावे.
महत्वाची सूचना (Old Land Record)
जुने रेकॉर्ड्स लोड होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतोय, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहेत. महसूल खात्याने हे रेकॉर्ड स्कॅन करून ठेवले असल्यामुळे सध्याच्या कागदपत्रांशी त्यांची तुलना करणे सोपे जात आहे.
अशा प्रकारे, तुम्ही सहजपणे जुने सातबारा उतारे ऑनलाइन पाहू शकतात. आणि आपल्या जमिनीबाबत ऐतिहासिक माहिती मिळवू शकतात.