जबरदस्तीने पँट काढून.., हल्ल्याच्या तपासात हादरवणारे तपशील समोर

Pahalgam Terror Attack | जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक तपासात काही नवीन धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची पाहणी करत गंभीर निष्कर्ष काढलेले आहे.

हल्ल्याच्या तपासामध्ये धक्कादाय नवीन तपशील-

तपास यंत्रणांना आढळलेले आहे की, २० जणांचे मृतदेह असे होते की त्यांची पँट खाली ओढलेली होती आणि त्यांच्या पँटची चेन उघडलेली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव व धर्म विचारल्यानंतर त्यांच्या डोक्यातून जवळून (Pahalgam Terror Attack) गोळी झाडल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झालेले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पीडितांकडून आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स मागितलेली होती आणि त्यांना कलमा वाचायला सांगितलेले. त्यानंतर जबरदस्तीने पँट काढून खतना तपासण्यात आला होता. जर पीडित हिंदू असल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांना जागीच गोळ्या घालण्यात आलेल्या होत्या.

यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025
यावर्षी पाऊस कसा राहणार? मोठं भाकित! स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज जाहीर Skymet Weather Report 2025

या हल्ल्यामुळं पीडित कुटुंबीय मोठ्या धक्क्यात होते, त्यामुळे कपड्यांकडे फारसे लक्ष दिले गेले नसावेत. घटनास्थळी मदत कार्य करणाऱ्या पथकांनी मृतदेह तसेच उचललेले आणि फक्त पांढऱ्या कापडाने झाकलेले होते. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २६ जणांपैकी २५ हिंदू पुरुषच होते, अशी माहिती तपास यंत्रणांकडून समोर आलेली आहे.

दहशतवादी समर्थकांवर जोरदार कारवाई होणार-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाला वेग मिळालेला असून त्राल, पुलवामा (Pulwama), अनंतनाग (Anantnag) आणि कुलगाम (Kulgam) परिसरात जवळपास ७० दहशतवादी समर्थक व ओवरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू आहेत. प्राथमिक तपासादरम्यान १५०० जणांना ताब्यात घेण्यात आलेले होते, त्यापैकी ७० जणांवर गंभीर संशय आहेत. लवकरच या भीषण हल्ल्याच्या दोषींपर्यंत पोहोचण्यात यश मिळेल, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केलेला आहेत.

अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process
अकरावी प्रवेशासाठी 10 कॉलेज निवडता येणार; ही ‘6’ कागदपत्रे लागणार 11th Admission Process

Leave a Comment