Panjabrao Dakh Live Hawaman Andaj: पंजाबराव डख हवामान अंदाज: राज्यामध्ये 13 ते 20 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी दर्शवलेला आहे. 13 जून पर्यंत राज्यभरात बदलत्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. परंतु 13 ते 20 जून दरम्यान राज्यभरात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी दिली आहे
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 13 ते 20 जून दरम्यान राज्य मध्ये सर्वत्र पाऊस होणार आहे. पावसावर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या तसेच लागवड अवलंबून असतील अशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे.
हा पाऊस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि कोकण सर्वत्र बरसणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे.
मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हैराण झालेले होते. आणि राज्यातील धरणे देखील खूप मोठे प्रमाणात पहिल्यांदाच मे महिन्यात भरल्याचे पाहायला मिळालेले होते. शेतकऱ्यांनी आपली शेती पेरणीसाठी तयार करून ठेवावीत पेरणीसाठी योग्य असा पाऊस पडताच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अशा प्रकारचा सल्ला पंजाबराव डख यांच्याकडून देण्यात आलेला आहे.
यंदा राज्यभरामध्ये चांगला पाऊस पडणार असून ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. तसेच 13 जून पासून मान्सूनचा चांगला सक्रिय होणार असल्याकारणाने राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे आणून पेरणीची पूर्वतयारी करावी अशा प्रकारचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.