PM Kisan Mobile Number Update: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Mobile Number Update) योजने अंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) रु. २०००/- प्रति हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यांत रु. ६०००/- प्रति वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येतो.
मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी बरेच शेतकरी मोबाईल नंबर बंद झाले किंवा नवीन नंबर घेतले असल्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे संदेश प्राप्त करू शकत नाहीत किंवा योजने संदर्भात माहिती मिळत नाही. ते आता खालील प्रोसेस नुसार पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करू शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी २०००/- रुपये तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण ६०००/- रुपये दिले जातात. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. PM Kisan Mobile Number Update
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असल्यास, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे स्टेटस, e-KYC इ. सर्व सुविधा सरकारने ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देखील ऑनलाईन केली आहे.
पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस – PM Kisan Mobile Number Update:
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
PM Kisan संकेतस्थळ ला भेट द्या. - Farmers Corner मधील Update Mobile Number वर क्लिक करा:
- PM Kisan संकेतस्थळावर Farmers Corner च्या बॉक्समध्ये Update Mobile Number या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका:
- Registration No मध्ये नोंदणी क्रमांक किंवा Aadhaar No. मध्ये आधार कार्ड नंबर टाका व कॅप्चा कोड टाकून सर्च पर्यायावर क्लिक करा.
- Get Aadhar OTP:
- सर्च पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे Get Aadhar OTP वर क्लिक करा.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP टाकून पुढे संमतीसाठी Consent वर क्लिक करा व Verify OTP वर क्लिक करा.
- नवीन मोबाईल नंबर टाका:
- लाभार्थ्यांची माहिती दाखवली जाईल. Enter New Mobile No. मध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका व Get OTP वर क्लिक करा.
- नवीन मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Verify OTP वर क्लिक करा.
- Click for Update Mobile Number:
- Click for Update Mobile Number वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. पीएम किसान पोर्टलवरील e-KYC करताना आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:ची e-KYC पडताळणी करू शकता. यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभाची Biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी CSC कडून रु. १५/- प्रती लाभार्थी फी आकारणी केली जाईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात तक्रार:
पीएम किसान योजनेसंदर्भात हप्त्याचे स्टेटस, e-KYC, मोबाईल नंबर अपडेट किंवा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव इ. संदर्भात तक्रार करण्यासाठी आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल. जर प्रतिसाद न मिळाल्यास, पीएम किसान हेल्प डेस्कच्या ईमेल pmkisan ict@gov.in वर संपर्क करा किंवा 011-23381092 (Direct HelpLine) वर कॉल करा. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी Grievance PM Kisan वर क्लिक करा.