Public Road Ownership: शिवरस्ता म्हणजे काय? त्यावर खाजगी मालकी हक्क सांगता येतो का? कायदा काय सांगतो. याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये शिवरस्ता हा खूप महत्त्वाचा असतो. पण अनेक वेळा काहीजण या रस्त्यावर खाजगी मालकी हक्क सांगत असतात तटबंदी करतात. तसेच किंवा शेतात जोडतात. यामुळे प्रश्न निर्माण होतो की, शिवरस्त्यावर हा मालकी हक्क मिळतो का?
शिवरस्ता म्हणजे काय?
शिवरस्त म्हणजे गावाबाहेरील सार्वजनिक उपयोगासाठी राखीव रस्ता असतो. याचा वापर हा शेतात जाण्यासाठी, पानवट्यापर्यंत जाण्यासाठी, तसेच जनावरे नेण्याचा रस्ता, किंवा शेजारच्या खेड्यांना जोडण्यासाठी शेतातून केलेली वाट यांचा समावेश होतो
महत्त्वाचं म्हणजे की रस्ते गाव नकाशा सातबारा उतार वरती “गाव सार्वजनिक रस्ता म्हणून नोंदणी” केलेली असते.
शिवरस्ता हा मालकीचा असतो का?
शिवरस्ता हा कोणाच्याही एकट्याचा मालकीचा नसतो. हा सार्वजनिक मालमत्ता म्हणून वरील करण्यात येत असतो. त्यामुळे व्यक्ती संस्था किंवा शेतकरी यावरती मालकी हक्क सांगू शकत नाहीत.
कायदेशीर तरतुदी काय आहेत?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार, कलम ४८ (७) नुसार, शिवरस्ता अतिक्रमण गुन्हा आहे आणि मंडल अधिकारी, तहसीलदार अतिक्रमण हटवू शकतात.
शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्यावर काय करावे?
जर तुमच्या इथे कोणी शिवरस्त्यावर अतिक्रमण करत असेल तर पुढील पद्धतीचा अवलंब करा.
पायरी | काय करावे |
---|---|
1️⃣ | तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांना लेखी तक्रार द्या |
2️⃣ | गाव नकाशा व 7/12 उतारा तपासा |
3️⃣ | RTI अंतर्गत अधिकृत माहिती मागवा |
4️⃣ | न्यायालयात दावा दाखल करा (स्थावर मालमत्ता अतिक्रमण विरोधात) |