नमस्कार मित्रांनो, नुकताच बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार? अशा प्रकारचा प्रश्न सध्या राज्यभरातील अनेक पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकालाची चिंता लागलेली आहे. निकालानंतरही विद्यार्थ्यांनी पालकांची मोठ्या प्रमाणात पुढील प्रवेशासाठी धावपळ होत असते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून इयत्ता 10 वी म्हणजेच एसएससी (SSC Result Maharashtra )परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइट्स जसे की mahahsscboard.in, mahresult.nic.in आणि msbshse.co.in यावर जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना थेट लिंकद्वारे आपला निकाल पाहता येणार आहे.
निकालाची संभाव्य तारीख SSC Result Maharashtra 2025
माध्यम रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल 2025 मध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मागील वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आलेला होता. यंदाही त्याच कालावधीत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे किंवा त्यापेक्षाही अगोदर रिझल्ट जाहीर होऊ शकतो.
परीक्षा आणि पात्रता निकष
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडलेली होती. आणि या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहेत.
निकाल चेक कसा करायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल – mahahsscboard.in
“SSC 10वी निकाल 2025” लिंकवर क्लिक करायचे.
नवीन पृष्ठ उघडल्यावर, आवश्यक माहिती (जसे की रोल नंबर) भरावी लागते.
माहिती भरल्यानंतर “सबमिट” करावे.