SSC Exam Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी याने बारावीच्या परीक्षा नुकत्याच घेतलेल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहावीची परीक्षा सुरू झालेली होती. ती मार्च महिन्यामध्ये संपलेली आता निकाल कधी लागणार? याची उत्सुकता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा पालकांना देखील लागलेले आहे. निकालाबाबत आता एक नवीन अपडेट पुढे आलेली आहेत. ती आपण पाहणार आहोत.
गेलेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल हे लवकरच लावण्यात येत आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे निकाल जाहीर झालेले होते. मात्र यंदा आणखी लवकर निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा राज्य मंडळाच्या इतिहासात सर्वात जलद निकाल असेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे निकाल हा पंधरा मे पूर्वीच लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बोर्डाने विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आयोजन हे लवकरच केल्यामुळे परीक्षा लवकर पार पडलेल्या होत्या. त्यामुळे निकाल देखील लवकर लावले जाणार आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. निकाल जुलै च्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा होणार असल्याचेही सांगण्यात आलेला आहे. दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे. परंतु बोर्डाकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
राज्यातील 9 विभागीय मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आलेली. परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये त्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबवले गेलेलं आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात आलेलं होतं. तसेच परीक्षा केंद्रान बाहेर भरारी पथके व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये 89 आणि बारावीच्या परीक्षेमध्ये 360 गैरव प्रकारांची नोंद झाल्याची माहिती स्वतः बोर्डाने दिलेली आहे.