SSC Result Maharashtra: अकोला: मेळघाट प्रकल्पामधील एका गावाची पुनर्वसन झाल्यामुळे बाप आणि लेकीच्या जीवनामध्ये शिक्षणाचे नवीन पाहत उजेडली आहे. गावाकडचे पुनर्वसन तर वडील व मुलीने दहावीचे धडे गिरवून एक सोबत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत दुर्गम भागांमधून आलेल्या मुलीचे कॉन्व्हेंट शिक्षण घेऊन तब्बल 88.80% गुण मिळवलेले आहेत तर लहानपणापासून शिक्षणाची इच्छा असणाऱ्या वडिलांनी दहावीची शिक्षण घेत 41% गुणांसह उत्तीर्ण झालेले आहे शिक्षणासाठी बाप लेकीची जिद्द समाजासाठी सध्या प्रेरणादायी ठरत आहे.
वेगळे प्रकल्पामधील गावाच्या पुनर्वसनाचा असाही सकारात्मक परिणाम दिसून आलेला आहे दुर्गम आदिवासी भागात अजून पर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचलेला नसतानाही शिक्षण शिक्षण घेण्याची नितांत इच्छा असतानाही सुविधा नसल्यामुळे किंवा अनेक आर्थिक क्षमतेच्या मुळे अनेकांना अशिक्षितच राहावे लागते. मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील गावांच्या पुनर्वसनामुळे एक सकारात्मक परिणाम आज समुदायलेला आहे काल दहावीचा निकाल लागला यामध्ये प्रमोद खांडवे व त्यांची मुलगी स्नेहा प्रमोद खांडवे यांची प्रेरणादायी व समाजासाठी दिशादर्शक निकाल लागला आहे.
प्रमोद खांडवे हे पूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधील गुलट घाट या गावात राहत होते शिक्षणाची आवड होती मात्र घरच्या आर्थिक परिस्थिती सर्व जंगलात शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे ती शिक्षण घेऊ शकले नव्हते पुढे अकोट वन्यजीव विभागात रोजंदारीवर मंजूर म्हणून ते कामाला लागलेले. 2013 साली मेळघाट वेगळे प्रकल्पातून गुलरघाट गावाचे पुनर्वसन झाले.
नवी दिशा:
राज्य सरकारने गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांना आज शिक्षणाची नवी दिशा मिळालेली आहे. प्रमोद खांडवे व स्नेह खांडवे यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास निसर्ग गटाचे अमोल सावंत यांनी व्यक्त केलेला आहे.