Panjab Dakh Hawaman Andaj: पंजाबराव डख यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात 15, 16, 17, 18 जून रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार ते आति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि आज पासून राज्यात सगळीकडेच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करताना शेतीची ओल पाहूनच पेरणी करावी अशा प्रकारचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा पंजाब डंख
राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मराठवाडा या भागांमध्ये सर्व भागात हवामान बदल झालेला असून 20 जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवलेला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करताना शेतीची ओल पाहूनच निर्णय घ्यावा. आणि हवामान अंदाज देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आणि आणि आता शेतीत पुरेशी ओल असल्यास पेरणी करण्यास हरकत नाही अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार, 15 जून ते 20 जून पर्यंत होणाऱ्या मुसळधार पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले संरक्षण करावे. विजा चमकत असताना झाडाखाली किंवा पाण्याच्या टाकी खाली थांबू नये तसेच मोबाईल टावर किंवा लोखंडी खांबाला हात लावून उभे राहू नये. अशा प्रकारची माहिती देण्यात येत आहे. आव्हान पंजाबराव डख यांनी केलेले आहे.