Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत झपाट्याने वाढ!

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा ग्राहकांच्या तोंडचे पाणी काढले आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात या सोन्यानी अद्भुत कामगिरी केली असून, सर्वच कसर भरून काढली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर 2023 मध्ये मौल्यवान सोन्यानी जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारीत चढउतार होते. तर मार्च महिन्यात डायरेक्ट गगनाला भिडल्या.

सोनं-चांदी दरवाढीवर काय आहेत कारणे?

एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात सोन्याने 4,400 रुपयांची दरवाढ केली. तर चांदीने 8,000 रुपयांची भर टाकली. या वर्षाच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये होता, तो आता 72,260 रुपये झाला आहे. म्हणजेच 9,160 रुपयांनी महागले आहे. तर 22 कॅरेट सोने 57,850 रुपयांवरुन 66,250 रुपये झाले, हे 8,400 रुपयांची वाढ आहे.

लोकसभा निवडणूक, आणि चीनची खेळी आणि डॉलरच्या तुलनेत गेल्या 10 वर्षांत रुपयाची झालेली मोठी घसरण या घटकांमुळे सोने-चांदीच्या दरवाढीला चालना मिळाली आहे. निवडणुकीच्या वातावरणात गंभीर सुरक्षितता म्हणून गुंतवणूकदार सोने-चांदीवर भर देत आहेत. चीनमधील घडामोडींचे परिणाम जागतिक बाजारावर होत असून, तेथील अस्थिरता आणि युद्धभीतीमुळे सोने-चांदीचा मागणीमध्ये वाढ झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मोठे घसरण झाल्याने देखील सोने-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. Gold Silver Rate Today

डिमॅट आणि म्युच्युअल फंड अकाउंटला असे जोडा नॉमिनी, हि आहे शेवटची तारीख

सोनं-चांदी दरवाढीचा पुढचा अंदाज काय?

या वर्षाच्या सुरुवातीला 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,850 रुपये असताना, आता तो 66,250 रुपये झाला आहे. याबरोबरच 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये असताना, तो आता 72,260 रुपये झाला आहे. एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये झाला आहे. सध्या चांदीचा भाव 90 हजारांच्या टप्प्याला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर सोन्याचे भाव 75,000 रुपयांच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे सांगत आहेत. Gold Silver Rate Today

Gold Silver Rate Today

सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव वाढीच्या मार्गावर असले तरी अनेक लोक अजूनही जेवलरीवर प्राधान्य देत आहेत. सराफा बाजारात केलेल्या खरेदीला कर आणि शुल्क लागू होत असल्याने जेवलरीच्या वापरावर लोक अधिक भर देत आहेत. त्या तुलनेत जेवलरीमधील मूल्यवर्धन कमी असते. तसेच खाजगी ग्राहकांना जेवलरी किंवा प्लेन सोने-चांदी यांचीही निवड करावी लागते. एकूणच सोने-चांदीतील ही घौडदौड अजूनही थांबलेली नाही.

Also Read : Rte Admission Maharashtra : मोठ्या प्रतीक्षेनंतर 9 लाख जागेसाठी आरटीईचे प्रवेश सुरू, असा भरा अचूक अर्ज

Leave a Comment