IMD Wheather Report Today: नमस्कार मित्रांनो, पुढील येणाऱ्या 24 तासांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केलेला आहे. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच नागपूर, वाशिम, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विशेषता मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान खात्याकडून राज्यभरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असला तरी देखील येणाऱ्या 48 तासांमध्ये छत्तीसगड, पश्चिम बंगाल, MP आणि ओडिशा मध्ये अती मुसळधार पाऊस होणार आहे. या राज्यामध्ये निव्वळ मुसळधार पावसाचा नव्हे तर 50 ते 70 किमी वेगाने वारं वाहण्याची शक्यता असल्याचे देखील हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आणि आपल्या पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.
