Ladki Bahin Yojana May Installment Date: राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नुकताच एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. दोन मे 2025 रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. खरंतर अक्षय्य तृतीया मुहूर्तावर एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिलच्या आत जमा होईल. अशा प्रकारची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात एप्रिलचा हप्ता मे महिन्यामध्ये लाडकीच्या बँक खात्यावर जमा केलेला आहे.
आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यामध्ये जमा करण्यात आलेला असल्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात येत आहे? याबाबत नवीन अपडेट पुढे आलेली आहे.
मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
खरंतर एप्रिलचा हप्ता नुकताच जमा करण्यात आलेला आहे. अशा मध्येच मे च्या हप्त्याबाबत विचार ना होऊ लागलेली आहे. याचे कारण असे प्रसार माध्यमांमध्ये एप्रिल आणि मे दोन्हीचे मिळून सोबत 3 हजार रुपये दिले जाणारे बोलले जात होते.
“या महिलांसाठी” लाडकी बहीण योजना बंद होणार?; आदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य
मात्र प्रत्यक्षात सरकारने एप्रिल आणि मी दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी जमा केलेले नाहीत. 2 मे रोजी फक्त एप्रिल महिन्याचा लाभ 1500 रुपये मिळालेला आहे.
पण आता या संदर्भात नवीन अपडेट पुढे आलेले आहे. ती म्हणजे मे महिन्याचा लाभ हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. अशी माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, मागील तीन हप्त्यांच्या तारखा पाहता प्रत्येक महिन्याचे पैसे हे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथी आठवड्यामध्ये जमा करण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्याचे पैसे देखील तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा करण्यात येऊ शकतात. अशी माहिती देण्यात येत आहे.
1500 की 2100 रुपये मिळणार?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळी महायुती सरकारने लवकरच रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाणार अशी आश्वासन दिलेले होतं. यामुळे या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये कधी होणार? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि पुढचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार? असा देखील मोठा सवाल लाडक्या बहिणींना पडला आहे.
लाडक्या बहिणीने 2100 रुपये जमा करण्याचा अजून कोणताही निर्णय शासन स्तरावर झालेला नाही. त्यामुळे पुढील मे महिन्याचा हप्ता हा पंधराशे1500 रुपयेचं लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
लाडक्या बहिणींना ‘मे’ चा हप्ता या मुहूर्तावर मिळणार; 1500 की 2100 रुपये मिळणार