Mahavitaran Solar Pump: महावितरण आणि केंद्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून 2 लाख सोलर पंप वितरण, असा भरा ऑनलाइन अर्ज

By Bhimraj Pikwane

Published on:

Mahavitaran Solar Pump

Mahavitaran Solar Pump: शेतकरी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शासनाने शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वीज बिलाचा त्रास होणार नाही आणि शेतीसाठी लागणारी पाण्याची गरज सुलभतेने भागवता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासनाने महावितरण कंपनीला केंद्र शासनाच्या कुसुम सोलर पंप योजनेंतर्गत 2 लाख सोलर पंप वाटपाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने 9 जानेवारी 2023 रोजी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून जाहीर केले. त्यामुळे आता राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना केंद्र शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत सोलर पंप मिळणार आहेत.

Mahavitaran Solar Pump

महावितरण कंपनी ही सोलर पंप वाटपाची कामगिरी करणार आहे. सुरुवातीला केंद्र शासनाने महाराष्ट्राला एक लाख सोलर पंप मंजूर केले होते. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा विभागाकडे अर्ज केले होते, त्यांना महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप दिले जाणार होते. परंतु नंतर केंद्र शासनाने आणखी एक लाख सोलर पंप महाराष्ट्रासाठी मंजूर केले.

त्यामुळे आता एकूण 2 लाख सोलर पंप महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. याचा अर्थ असा की, ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा विभागाकडे अर्ज केले होते, त्यांच्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप मिळणार आहेत. याचा फायदा राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना होणार आहे.

सोलर पंप वाटपासाठी महावितरण एकच मोठी यादी वापरणार आहे. या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आधीच्या सूचीत होते, त्यांना प्राधान्य दिले जाईल. महाऊर्जा विभागाने शेतकऱ्यांची ज्येष्ठता सूची महावितरणला तात्काळ देणे आवश्यक आहे. त्यानंतरच महावितरण कंपनी सोलर पंप वाटपाची प्रक्रिया सुरू करेल.

सोलर पंप शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करणार आहे. शेतीसाठी लागणारे पाणी सौर ऊर्जेच्या साह्याने उचलले जाईल. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार वीज कंपन्यांकडे जावे लागणार नाही. सोलर पंप ही स्वच्छ आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची देणगी आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि शेती व्यवसायाला गती द्यावी.

एकंदरीत, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. २ लाख सोलर पंप शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतीच्या खर्चात बरीच बचत होईल. सोबतच वीज बिलांचा त्रासही राहणार नाही.

Mahavitaran Solar Pump: असा भरा ऑनलाइन अर्ज

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.