RTE Admission 2024-25 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना

By Bhimraj Pikwane

Published on:

rte admission maharashtra

RTE Admission 2024-25: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अधिसूचना दिनांक 09.02.2024 सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. सन 2024-25 या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक 16.04.2024 पासून लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal ( Rte Website) या लिंकवर पालकांना आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी करता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पालकांसाठी सूचना RTE Admission Online Apply

शाळा खालील कारणांमुळे आरटीई 25 टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी:
■ अवैध निवासाचा पत्ता
■ अवैध जन्मतारखेचा दाखला
■ अवैध जातीचे प्रमाणपत्र

■ अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
■ अवैध फोटो आयडी
■ अवैध दिव्यांग प्रमाणपत्र

RTE परिपत्रक मध्ये दिलेल्या पालकांसाठी सूचना खालीलप्रमाणे

  • ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
  • भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा • भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल. rte admission maharashtra
  • विदयार्थ्यांना निवासस्थानापासून 1 किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.
  • विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना 25 टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल. rte admission maharashtra
  • अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा/ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.

सुचणे बाबत परिपत्रक pdf (RTE Admission process instruction pdf) आपल्या telegram ग्रुप मध्ये देण्यात आले आहे.

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

2 thoughts on “RTE Admission 2024-25 : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांसाठी सूचना”

Leave a Comment

Footer
Close Visit Mhshetkari