माणिकराव कोकाटे रम्मी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की…? चर्चांना उधाण Rummy Game Video Manikarao kokate

Rummy Game Video Manikarao kokate: राजकीय वर्तुळात सध्या एकाच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहेत: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषद सभागृहात मोबाईलवर रमी हा ऑनलाइन पत्त्यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात, जेव्हा शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न चर्चेला येत असताना कृषीमंत्र्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधी पक्षांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो क्षणार्धात प्रचंड व्हायरल झालेला. या घटनेनंतर महाविकास आघाडीसह इतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे.

व्हिडिओबद्दल कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण आणि त्यानंतरचे पडसाद

व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. माणिकराव कोकाटे म्हणाले की, “गेम स्किप करत कोणीतरी गेम डाउनलोड केला होता, तो स्किप करत होतो. विधानसभेचे कामकाज पाहिले. ते दिसले नाही म्हणून फोन ठेवून दिला.”

एकीकडे कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले असताना, दुसरीकडे या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदार तटकरे यांच्यासमोर खेळण्याचे पत्ते उधळले. “तुमच्या मंत्र्यांना विधानसभेत नव्हे तर घरी पत्ते खेळायला सांगा,” असे म्हणत त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर अजित पवार गट आणि छावाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर! या तारखेला होणार जमा!

व्हिडिओ कोणी काढला? राजकीय वर्तुळात कुजबुज!

या संपूर्ण घटनेत, माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ नेमका कोणी काढला, यावरच राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. माध्यमांमध्येही त्यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे, परंतु मूळ प्रश्न तो व्हिडिओ कोणी चित्रित केला हा आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या कुजबुजीनुसार, काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत:

  • हा व्हिडिओ त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीने काढला का? विधानभवनातील बैठकीच्या व्यवस्थेनुसार, मंत्री महोदयांच्या मागे सहसा मंत्रीच बसतात.
  • त्यांच्याच कोणी ‘परममित्राने’ हा व्हिडिओ काढून तो रोहित पवार यांना दिला का?
  • कोकाटे यांची इतकी कनिष्ठ मैत्री नेमकी कोणासोबत आहे?

या संपूर्ण प्रकरणाची खरे तर विधानसभा अध्यक्षांनी चौकशीच लावली पाहिजे, असेही म्हटले जात आहे, जेणेकरून कोकाटेंवर एकतर्फी अन्याय होऊ नये.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan

मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी आणि राजीनाम्याची मागणी

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कडक शब्दांत सुनावले. मुख्यमंत्री म्हणाले, “मी रमी खेळत नव्हतो, अचानक जाहिरात पॉपअप झाली, असे त्यांनी सांगितले असले तरी जे घडले ते भूषणावह नाही.” पुढे ते म्हणाले, “विधिमंडळात जेव्हा चर्चा चालते तेव्हा आपले कामकाज नसले तरीही आपण गांभीर्याने बसणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्रे वाचता; पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हे निश्चितच योग्य नाही, हे अतिशय चुकीचे आहे.”

कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आणि पुढील काळात यावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळत आहे: असा करा ऑनलाईन अर्ज! Bank Of Maharashtra Personal Loan

Leave a Comment