RTE 25% Addmission: आरटीई ऑनलाईन अर्ज सुरू, या तारखे अगोदर भरा आपल्या पाल्याच्या ऑनलाईन अर्ज

RTE 25% Addmission: शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यातील बदलांमुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत आणखी अनेक जागांची भर पडली आहे. राज्यभरातील 75,974 शाळांमध्ये प्रवेशासाठी 9,72,823 जागा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. RTE 25% Addmission

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बदललेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमांनुसार, किती शाळांमध्ये प्रवेश कोट्यापेक्षा जास्त अर्ज आले आहेत, याचा आढावा घेऊन सोडतीचा निर्णय घेतला जाईल. वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

RTE 25% Addmission Maharashtra Start Date

शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होते, याकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष आहे. आरटीईसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली असून पालक 16 ते 30 एप्रिल दरम्यान ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

Loan For Solar Roof Top : पी एम सुर्यघर अंतर्गत सोलर बसवण्यासाठी SBI बँक देणार कर्ज

अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद घोसावी यांनी दिली. गरीब, वंचित, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना आरटीईद्वारे प्रवेश दिला जातो. शिक्षण विभागाने यंदा rte प्रवेश प्रकेयेत बदल केले आहेत. यानुसार ,विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा किंवा स्थानिक सरकारी शाळा नसल्यासच विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. शाळा निवडताना, विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल:

अनुदानित शाळा, सरकारी शाळा, स्थानिक स्वायत्त शाळा आणि स्वयं-वित्तपोषण शाळा.पालकांना अनुदानित शाळांपेक्षा स्थानिक सरकारी शाळा किंवा सरकारी शाळांना प्राधान्य द्यायचे असल्यास, ते त्यांच्या पसंतीनुसार शाळा निवडू शकतात. आरटीई प्रवेशासाठी महापालिका शाळा, नगरपालिका शाळा, नगरपरिषद शाळा, नगर पंचायत शाळा, कटक मंडळ शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे .अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक – https://student.maharashtra.gov.in/adm_portal

Leave a Comment