या आठवड्यात पावसाचा कसा राहणार? हवामानतज्ञ रामचंद्र साबळे Ramchandra Sable Hawaman Andaj

हवेचा दाब वाढल्याने राज्यात पावसाची उघडीप, विदर्भ-मराठवाड्याला प्रतीक्षा

Ramchandra Sable Hawaman Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी राज्यासाठी पुढील आठवड्याचा (३० जून ते ५ जुलै) हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या काळात हवेचा दाब वाढणार असल्याने पावसाचा जोर कमी राहणार आहे. आणि काही ठिकाणी पावसाची उघडीप पाहायला मिळेल.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर! या तारखेला होणार जमा!

पाऊस कमी होण्याची कारणे

हवेच्या दाबातील वाढ हे पावसाचे प्रमाण घटण्याचे मुख्य कारण आहे. या आठवड्यात हवेचा दाब १००४ हेक्टापास्कलपर्यंत वाढण्याची शक्यता आहेत. यामागे काही प्रमुख नैसर्गिक घटक कारणीभूत देखील आहेत:

  • अरबी समुद्रातील बदल: अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे ढगांची निर्मिती मंदावते आणि पावसाचे प्रमाण घटते.
  • जागतिक स्थिती: प्रशांत महासागरावरील (Pacific Ocean) पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानही घटले आहे (पेरूजवळ १७°C, इक्वेडोरजवळ २३°C), ज्यामुळे तेथील हवेच्या दाबात वाढ होत आहे. हे बदल मान्सूनच्या प्रवाहांना प्रभावित करत असतात.

प्रादेशिक अंदाज आणि अपेक्षित पाऊस

पुढील ५-६ दिवस हवेचा दाब वाढलेलाच राहील. यामुळे राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता कमी आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan
  • विदर्भ आणि मराठवाडा: या प्रदेशातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
  • हलका पाऊस: बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत असल्याने त्या भागातून ढगांची निर्मिती सुरू राहणार आहे. त्यामुळे काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • एकूणच, येणाऱ्या आठवड्यात मान्सूनचा वेग काहीसा मंदावलेला दिसून येईल. चांगल्या पावसासाठी नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment