महिलांना एप्रिलचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरे यांची महत्त्वाची माहिती
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारने महिलांना 1500 रुपये महिना देण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” राबवण्यास सुरुवात केलेली होती. राज्य सरकारकडून नियमितपणे महिलांना 1500 रुपये या योजनेच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 09 हप्ते महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. परंतु एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता 1500 रुपये कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांना पडलेला आहे. याचेच उत्तर आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
राज्यातील महिलांना जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंत 09 हप्त्याचे पैसे महिलांना जमा झालेले आहेत. आणि एप्रिल चे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आता नुकतीच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने म्हणजेच 30 एप्रिल रोजी महिलांना लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती आलेली आहे. आणि त्यामुळे राज्यभरातील महिलांना अक्षय तृतीयेचा सण हा गोड ठरणार आहे. विशेषत: यावर्षी लाभार्थींच संख्या कमी होणार की वाढणार? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला असताना आता एप्रिल चा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतेच दिलेली आहे.
महिलांना एप्रिल चे 1500 रूपये कधी मिळणार; साम टीव्ही यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेत असताना राज्यभरातील ज्या महिलांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून लाभ घेतलेला आहे. असे आढळल्यास लाडक्या बहिणीने विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बनावट कागदपत्रांचा वापर करून जर कोणी लाभ मिळवला असेल तर तो लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. आणि बनावट कागदपत्रे चा वापर करून ज्या लाडक्या बहिणीने लाभ मिळवलेला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी एकूण अर्जदारांपैकी जवळपास 11 लाख अर्ज हे अपात्र करण्यात आले असल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/