Python Rescued Video Viral साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटत असतो. काही विषारी साप प्राणघातक असतात; पण अजगर हाही धोकादायक सरपटणारा प्राणी मानला जातो. हा प्राणी तसा संथ गतीने फिरणारा असला तरी त्याच्या विळख्यात कोणताही प्राणी एकदा अडकला की, मग तो जिवंत वाचण्याची शक्यता फारच कमी असते.
अगदी मगर, हत्तीपासून कोणताही प्राणी असो तोही त्याच्या विळख्यातून वाचू शकत नाहीत. महाकाय अजगर माणसालाही आपल्या वेटोळ्यात गुंडाळून त्याचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे अनेकांच्या मनात या प्राण्याविषयीही फार भीती दडलेली आहेत. सध्या सोशल मीडियावर अजगराचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओत वन विभागाचा एक कर्मचारी अडचणीत अडकलेल्या अजगराची सुटका ? करताना दिसत आहे. पण, त्या अजगराची सुटका करण्याच्या प्रयत्नात त्या बिचाऱ्याचाच जीव धोक्यात येतो.
यावेळी अजगर त्याच्या मांडीला असा काही विळखा घालतो की, त्यातून त्या कर्मचाऱ्याला सुटणे अवघड होऊन जातं. तो जितक्या ताकदीने मांडीभोवतीचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याच ताकदीने अजगरही आपली पकड घट्ट करतोय.
व्हायरल व्हिडिओ
व्हिडीओत तुम्ही पाहू शकतात की, वन विभागाचा एक कर्मचारी अडचणीत अडकलेल्या अजगराच्या तोंडाला पकडून, त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे कर्मचाऱ्याने त्याचे तोंड घट्ट पकडून ठेवले आहे; पण आपल्या लांब शरीराने अजगर कर्मचाऱ्याच्या मांडीला विळखा घालतोय.
तो त्याच्या मांडीला दोन वेटोळे घालून, त्याला पूर्णपणे बंदिस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, कर्मचारी ताकद लावून, त्यापासून स्वत:चा जीव वाचवण्याचे प्रयत्न करीत असतो. कर्मचारी जितक्या ताकदीने त्याचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करतो, तितक्याच ताकदीने अजगर पुन्हा पुन्हा त्याची मांडी अडकवून ठेवतोय.
तो कर्मचारी शिकस्तीचे प्रयत्न करून कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईल की वन कर्मचाऱ्यांची नोकरी काही सोपी नसते. त्यांना प्राण्यांशी संघर्ष करून जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागते.