A Tree Made Farmer Millionaire Maharashtra : एका झाडामुळे यवतमाळमधील शेतकरी करोडपती झालेला आहे. तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसेल. काहींचा तर यावरती विश्वास देखीलबसणार नाही. पण यवतमाळ मधील पुसद तालुक्यातील या शेतकर्याला एका झाडामुळे खरंच
कोट्यवधींचा फायदा झाला आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात?
एका झाडामुळे शेतकरी करोडपती! अशी लागली करोडोंची लॉटरी
रात्रीत शेतकरी कोट्याधीश झाला
यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकर्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केलेले आहे. ही बाब कुणाच्याही पचनी पडणार नाहीत. मात्र हे सत्य आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका शेतकर्याची आहे. केशव शिंदे असं या शेतकर्याचे नाव आहेत. एका वडिलोपार्जित झाडामुळे त्यांना अचानक ही लॉटरी लागलेली आहे. न्यायालयात दाद मागितल्यानंतर या झाडाचे मूल्यांकन काढले तेव्हा ते 4 कोटी 97 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली नी एकच गजहब उडालेला.
काय आहे रक्तचंदनाच प्रकरण?
केशव शिंदे यांच्या 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. 2013 — 14 पर्यंत हे झाड कशाचे आहेत. हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हते. 2013 14 मध्ये रेल्वे खात्याने एक सर्वे केलेला आणि. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आलेले होते. त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असल्याचे आणि त्याचे मूल्य समजावून सांगितलेले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला होता. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करत असल्याचे पाहायला दिसून आले होते.
त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगी संस्थेकडून मूल्यांकन काढलेले होते. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन 4 कोटी 97 लाख रुपये असल्याचे समोर आलेले होते. मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केलेली होती. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिलेले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकर्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आलेली आहेत. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढलेले होते. मात्र ते जास्त असल्याने रेल्वे त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केलेले होते.
एका झाडाला बनवलं करोडपती! पुसदच्या शेतकऱ्याची गोष्ट पहा
नागपूर खंडपीठात 1 कोटी रुपये झाले जमा
१०० वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून मध्य रेल्वेतर्फे १ कोटी रुपयेची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा करण्यात आलेली त्यातील 50 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी नागपूर खंडपीठाने दिलेली. तसेच शिंदे यांना पूर्ण मोबदला देण्याच्या दृष्टीने त्या वृक्षाचे मूल्यांकन करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची शेत जमीन संपादित करण्यात आलेली आहेत. मूल्यांकनानंतर उर्वरित रक्कम शेतकर्याला मिळेल. याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झालेली. याचिकेतून 8 फेब्रुवारी 2018 रोजी पारित केलेल्या मोबदला रद्द करावा आणि लाल चंदनाचे वृक्ष व इतर वृक्षाविषयीचे आदेश गेल्या सुनावणीत दिलेले होते. त्यानंतर एक कोटी रूपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वेने न्यायालयात दिलेली आहेत.