एसटी महामंडळात 29,361 पदाची मेगा भरती; संपूर्ण माहिती MSRTC Recruitment 2025

MSRTC Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC – एसटी महामंडळ) सध्या ८६,५६२ कर्मचारी कार्यरत आहे. यात वर्ग १, २, ३, ४ अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, शासनाने मंजूर केलेल्या १ लाख २५ हजार ८१४ कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आजही तब्बल २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत.

या मोठ्या कर्मचारी कमतरतेमुळे एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून, महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर! या तारखेला होणार जमा!

रिक्त पदांमुळे एसटी महामंडळाच्या कामकाजावर परिणाम

  • आर्थिक नुकसान: कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
  • पदोन्नती आणि सेवाज्येष्ठतेचा अभाव: पदोन्नती आणि सेवाज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.
  • नियोजनाचा अभाव: नियोजनाच्या अभावामुळे ही पदे अद्याप रिक्त असून, यासाठी कर्मचारी वर्ग खात्यांचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी पदही रिक्त

महामंडळात अनेक विभागांत विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. हा विभाग पातळीवरील प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्यांची पदबढती, वेतन निश्चिती, वेतन वाढ, रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहेत. कामगार संघटनांकडून याबाबत आवाज उठवला जात आहे.


सेवाज्येष्ठता यादी आणि पदोन्नतीचा प्रश्न

एसटी महामंडळात दरवर्षी सेवाज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नती न मिळाल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. २०१९ नंतर अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाही. २०१९ च्या सेवाज्येष्ठता यादीवर २०२२-२०२३ या कालावधीमध्ये एकूण आठ वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची (DPC) बैठक घेण्यात आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan

याशिवाय, योग्य नियोजन न केल्याने अनेक विभागांत वाहन परीक्षक, सहाय्यक कारागीर, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाहीत.


कर्मचारी संघटनांची भूमिका

  • संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना: “अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खूप नुकसान होत आहे. महामंडळाची देखील आर्थिक गणिते कोलमडतात. प्रवाशांना दर्जेदार, चांगल्या सुविधा देण्यास अडचणी येत आहेत.”
  • श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस: “अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवाज्येष्ठता मिळाली नसल्याने कर्मचारी वर्गाचे प्रचंड आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे.”

या रिक्त पदांमुळे एसटी महामंडळाच्या कामकाजावर आणि कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळत आहे: असा करा ऑनलाईन अर्ज! Bank Of Maharashtra Personal Loan

Leave a Comment