पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2000 रूपये मिळवण्यासाठी, ही ६ कामे लगेच करा

PM Kisan 20th installment date: पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै २०२५ रोजी बिहारच्या मोतिहारी दौऱ्यावर असताना, याच दिवशी ते PM Kisan योजनेचा २० वा हप्ता जारी करू शकतात. मात्र, या कार्यक्रमाबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाहीत.

सरकारने सोशल मीडियावर सूचना देत स्पष्ट केले आहे की, काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्या नाहीत, तर हा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तात्काळ पुढील ६ महत्त्वाचे टप्पे पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.


काय आहे पीएम किसान योजना?

PM-KISAN योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० ची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये DBT (Direct Benefit Transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आता लवकरच २० वा हप्ता येणार असून, यासाठी काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

मोफत शिलाई मशीन योजना: महिलांना १५,००० रुपये मिळणार; असा करा अर्ज Silai Machine Yojana 2026

हप्ता मिळवण्यासाठी आवश्यक ६ गोष्टी

२० वा हप्ता वेळेवर आणि विनाअडथळा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील ६ गोष्टी तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे:

१. ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य: लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. हे तुम्ही PM Kisan पोर्टलवर OTP द्वारे करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने देखील करू शकता.

२. आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक: तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक (जोडलेला) असणे गरजेचे आहे. लिंक नसल्यास रक्कम ट्रान्सफर होणार नाही.

आई कर्ज योजना: महिलांसाठी 15 लाख बिनव्याजी कर्ज! संपूर्ण माहिती पहा Aai 15 Lakh Loan

३. बँक तपशील तपासा: तुमचा खाते क्रमांक आणि IFSC कोड योग्य आहे का याची खात्री करा. चुकीच्या तपशीलामुळे ट्रान्झॅक्शन अयशस्वी होऊ शकते.

४. जमिनीच्या कागदपत्रांची अचूकता तपासा: जमिनीच्या नोंदणीत काही त्रुटी असल्यास, ती त्वरित स्थानिक महसूल कार्यालयात संपर्क करून दुरुस्त करावी, अन्यथा पात्रता रद्द होऊ शकते.

५. लाभार्थी स्टेटस तपासा: www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला लाभार्थी दर्जा, मागील हप्त्यांची माहिती आणि अर्जाचा स्टेटस पाहू शकता.

लाडकी बहीण योजनेचे ₹१,५०० बंद होणार? ई-केवायसी अपात्र महिलांची यादी जाहीर; यादीत नाव पहा Bahin Personal Loan Low Cibil Score

६. मोबाईल क्रमांक अपडेट ठेवा: जर जुना किंवा बंद मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल, तर OTP व अन्य महत्त्वाचे अलर्ट मिळणार नाहीत. त्यामुळे मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे.


मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?

  • https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • ‘Farmer Corner’ मध्ये ‘Update Mobile Number’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक भरा.
  • Captcha कोड भरून Submit करा.
  • दिलेल्या सूचनांप्रमाणे मोबाईल नंबर अपडेट करा.

वरील सर्व अटी व शर्ती वेळेत पूर्ण केल्यासच आपल्याला PM-KISAN योजनेचा २० वा हप्ता वेळेवर आणि विनाअडथळा मिळेल. अन्यथा आपला हप्ता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment