Ativrushti anudan 2025: शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे! मे २०२४ तसेच जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. या संदर्भात १६ जुलै २०२५ रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहेत.
Crop Insurance
ही मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहेत. आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे, हे आपण या लेखात सविस्तर पाहूया.
Crop Insurance List
मंजूर झालेले जिल्हे आणि निधी
राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, खालील जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी मंजूर करण्यात आला आहे:
- सोलापूर जिल्हा:
- मे २०२४ मधील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २,७४८ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
- यामध्ये ९७६.६७ हेक्टर क्षेत्रातील फळबागा आणि शेती पिकांचे नुकसान झालेले शेतकरी समाविष्ट आहेत.
- सांगली जिल्हा:
- जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १८,३३६ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी २९ लाख ५८ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्हा:
- जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १,५५१ शेतकऱ्यांना २ कोटी ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
मदत वितरणाची प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम
ही मंजूर झालेली मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या संपूर्ण वितरणासाठी DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलचा वापर केला जाईल, ज्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
Crop Insurance Bank Account Transfer
- भरपाईचे दर: भरपाईचे दर १ जानेवारी २०२४ च्या सरकारी निर्णयानुसार ठरवले जातील. यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांसाठीचे निश्चित केलेले दर समाविष्ट आहेत.
- हेक्टर मर्यादा: प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच मदत मिळेल, ही मर्यादा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
हा संपूर्ण शासन निर्णय आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती maharashtra.gov.in या अधिकृत सरकारी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे, त्यांनी नियमितपणे आपले बँक खाते आणि सरकारी वेबसाइट तपासावी.
Crop Insurance In Bank account
सविस्तर माहिती पाहण्यासाठी युट्युब व्हिडिओ देण्यात आलेल्या पाहू शकता