अण्णा भाऊ साठे योजना: समाजासाठी थेट कर्ज योजनेत १ लाखांपर्यंतची मर्यादा; २० जुलैपर्यंत अर्ज करावे!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग आणि तत्सम समाजातील दारिद्र्यरेषेखालील (BPL) नागरिकांसाठी थेट कर्ज योजना (Direct Loan Scheme) राबवण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत १ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिली जाणार आहेत. इच्छुकांनी २० जुलैपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Anna Bhau Sathe Loan Scheme


अण्णा भाऊ साठे थेट कर्ज योजना: सविस्तर माहिती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींमधील दारिद्र्यरेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.

या योजनेंतर्गत पूर्वी २५ हजार रुपये असलेली कर्जाची मर्यादा आता १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाने केलेले आहेत.

फक्त १ मिनिटात सिबिल स्कोअर चेक करा आणि मिळवा बिनव्याजी कर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

अर्ज अधिकृत वेबसाईट: https://www.slasdc.org/loan.php


योजनेची रचना आणि प्राधान्यक्रम:

  • प्रकल्प मर्यादा: थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा १ लाख रुपये आहे.
  • महामंडळाचा हिस्सा: यात महामंडळाचा हिस्सा ८५ टक्के असेल.
  • अनुदान: १० टक्के अनुदान दिले जाईल.
  • अर्जदाराचा हिस्सा: अर्जदाराला फक्त ५ टक्के रक्कम स्वतःकडील जमा करावी लागेल.

प्राधान्यक्रम:

बँक ऑफ बडोदामध्ये 02500 जागांसाठी मोठी भरती जाहीर; पदवीधरांना संधी!
  • ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना प्राधान्य राहणार आहे.
  • सैन्य दलातील वीरगती प्राप्त झालेल्या वारसाच्या कुटुंबातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे.

अर्जासाठी आवश्यक अटी व कागदपत्रे:

  • अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावेत.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/प्रशिक्षण असावेत.
  • अर्जदाराचा सिबिल स्कोर ५०० च्या वर असावा.( सर्वांचा असतोच)

अर्ज कोठे व कधी सादर कराल?

कर्ज मागणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह २० जुलै २०२५ पर्यंत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावेत.

अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बाजार समोर, सोलापूर येथे.

जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी हे आवाहन केलेले आहे. या संधीचा लाभ घेऊन मातंग समाजातील गरजू घटकांनी आपले आर्थिक जीवनमान उंचावावे, असे आवाहन करण्यात आले आहेत.

पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता 2000 रूपये मिळवण्यासाठी, ही ६ कामे लगेच करा

Leave a Comment

Close Visit Marathinews360