Battery Operated Sprayer Pump: बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ 

Battery Operated Sprayer Pump: बॅटरी संचलित फवारणी पंप मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा दिलेली होती. या योजनेअंतर्गत नॅनो युरिया, डीएपी, आणि बॅटरी संचलित फवारणी पंप या घटकांना १००% अनुदान देण्यात येत होते. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून होती. २४ जुलैला नॅनो युरिया व डीएपीसाठी सोडत यादी जाहीर करण्यात आली, मात्र बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी अद्याप यादी जाहीर झालेली नाही. आता, फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

सोयाबीन व अन्य तेलबिया पिकांच्या उत्पादकतेत वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व अन्य तेलबिया उत्पादन वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप १००% अनुदानावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. Battery Operated Sprayer Pump

कापूस सोयाबीन अनुदान : या तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

अर्ज प्रक्रिया: बॅटरी संचलित फवारणी पंप

लाभार्थ्यांना निवडण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जांद्वारे होणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

Battery Operated Sprayer Pump: अर्ज कसा करावा?

  1. वेबसाईटला भेट द्या: महाडीबीटी पोर्टललाभार्थी शेतकरी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगिन करा.
  2. अर्ज करा: अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
  3. कृषि यांत्रिकीकरण: “कृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य” या घटकावर क्लिक करा.
  4. तपशील: “मनुष्यचलीत औजारे” हा घटक निवडा.
  5. यंत्र/औजारे व उपकरणे: “पिक संरक्षण औजारे” निवडा.
  6. मशीनचा प्रकार: “बॅटरी संचलित फवारणी पंप (गळीतधान्य/कापूस)” निवडा.
  7. अर्ज जतन करा: अर्ज जतन करून सादर करा.

Battery Operated Sprayer Pump: सन २०२४-२५ मध्ये या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु कमी अर्ज प्राप्त झाल्यामुळे अर्जाची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

Whatsapp Image 2024 08 20 At 1.23.25 Pm

Mahadbt Farmer Scheme: कापूस साठवणूक बॅग अनुदान, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती

Leave a Comment