Board exams result ‘या’ तारखेला लागणार दहावी बारावी बोर्डाचा निकाल; घ्या जाणून सविस्तर माहिती..

By Bhimraj Pikwane

Published on:

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे चालू असणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा संपल्या असून यांचा निकाल कधी जाहीर करणार आहेत. याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर याचबद्दल आज आपण जाऊन घेणार आहोत.

दहावी आणि बारावीच्या निकालाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्यांदाच 3 ते 4 जून रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचा बोर्डाचा विचार आहे. अशी माहिती शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली आहे.

पुणे मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. कोरोनानंतर प्रथमच पूर्वीप्रमाणे परीक्षा घेण्यात आली. मात्र त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ लागू करण्यात आला होता.

त्यामुळे कॉपी प्रकरणांमध्ये निश्चितच मोठी घट झाली आहे. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनी वेळेवर उत्तरपत्रिका तपासल्या आहेत.

सर्व उत्तरपत्रिका तपासल्यानंतर आता निकालाची तयारी सुरू झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्डाच्या निकालाच्या दृष्टीने आवश्यक असलेले ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.Board exams result date

दहावी-बारावीनंतरच्या पुढील प्रवेशांना विलंब होणार नाही याची काळजी मंडळाकडून घेतली जाणार आहे. त्यानुसार निकाल वेळेत जाहीर व्हावा, असे नियोजनही मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल पहिल्यांदाच जूनमध्ये जाहीर होणार आहे.

Result बघण्यासाठी येथे क्लिक करा

मे अखेरपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास ३ ते ४ जूनपर्यंत निकाल जाहीर केला जाईल, असेही बोडनि यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यानंतर दहावीचा निकाल सहा ते आठ दिवसांनीजाहीर करावा, अशी तयारीही सुरू करण्यात आली आहे.Board exams result date

 

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “Board exams result ‘या’ तारखेला लागणार दहावी बारावी बोर्डाचा निकाल; घ्या जाणून सविस्तर माहिती..”

Leave a Comment

Footer
Close Visit Mhshetkari