Gharkul Anudan Yojana List 2025: राज्यातील लाखो गोरगरीब कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहेत. महाराष्ट्र सरकारने घरकुल योजना 2025 अंतर्गत मोठा निर्णय घेतलेला असून, आता घरकुल योजनेचे अनुदान वाढवण्यात आलेले आहेत. यामुळे अनेक गरजू कुटुंबांचे मोफत घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहेत.
Gharkul Anudan Yojana List 2025
घरकुल योजना ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत येणारी महत्त्वाची योजना आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे गोरगरीब, बेघर, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना शासकीय मदतीने पक्के घरे उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
काय आहेत नवीन अपडेट?
➡️ घरकुल योजनेच्या अनुदानात थेट ₹५०,००० ची वाढ करण्यात आलेली आहेत.
➡️ योजनेत सौर पॅनेलची मोफत सुविधा देण्यात येणार आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांना वीज बिलाचा भार कमी होणार आहेत.
➡️ एकाच वेळी २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिली जाणार आहे.
➡️ महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून, घराची मालकी महिलांच्या नावावर असणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत.
घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करावा
घरकुल योजनेचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येत आहेत.
अर्जासाठी https://rdd.maharashtra.gov.in/en/scheme/pradhan-mantri-awas-yojana-rural/ वेबसाइट किंवा तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयात भेट द्यावी लागते.
Gharkul scheme 2025 : सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावेत असा प्रयत्न आहेत. त्यानुसार यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येते. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान योजना राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरीता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरीता रमाई आवास योजना अनुसूचित जमाती करीता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती करीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहेत.
वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-1 सन 2016-17 ते 2021-22 या कालावधी मध्ये राज्यात राबविण्यात आलेला आहे. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरु केलेला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहेत. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहेत. वरील बाबी विचारात घेता, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत टप्पा-2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेत.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्यपुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातुन 50000/₹ एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहेत. या 50000/₹ रक्कमेमधून 35000/₹ अनुदान हे घरकुल बांधकामा साठी तर 15000/₹ इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर 1/ KW मर्यादेपर्यंत सौर उर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील 15000₹/ अनुदान मिळणार नाहीत..
आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
जात प्रमाणपत्र (असल्यास)
SECC-2011 सूचीतील नाव
बँक पासबुक
घर नसल्याचे प्रमाणपत्र
पात्रता कोणाला?
- ✅ ज्या कुटुंबांकडे स्वतःचे पक्के घर नाहीत
- ✅ ज्या कुटुंबांची नोंद SECC 2011 यादीनुसार आहेत
- ✅ वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी
- ✅ विधवा, परित्यक्ता, एकल महिला यांना प्राधान्य