आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर! यादीत नाव चेक करा

तुम्ही जर घरकुल योजनेसाठी (Gharkul Yojana) अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे! आता तुम्ही तुमच्या मोबाइलवरच घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने घरकुल यादीमध्ये (Gharkul Yadi 2025) तुमचं नाव तपासू शकता. एवढंच नाही, तर तुमच्या संपूर्ण गावाच्या घरकुल यादीमध्ये कोणाकोणाची नावे समाविष्ट आहे. याची सविस्तर माहितीही तुम्हाला पाहता येणार आहेत.


घरकुल यादीमध्ये काय माहिती मिळते?

यादीमध्ये तुमचं नाव असल्यास, तुम्हाला तुमचं घर मंजूर झालं आहे की नाहीत, तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांना किती हप्ते मिळाले आहे, याची सर्व माहिती उपलब्ध असते.

घरकुल यादीमध्ये खालील महत्त्वपूर्ण तपशील पाहायला मिळतात:

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: पीएम-किसान योजनेचा 20 वा हप्ता जाहीर! या तारखेला होणार जमा!
  • अर्जदारांची नावे ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहेत.
  • प्रत्येक अर्जदाराचा ॲप्लिकेशन नंबर (Application Number).
  • लाभार्थ्याचे पूर्ण नाव.
  • प्रवर्गानुसार प्राधान्य (Priority).

ही सविस्तर माहिती तुम्हाला योजनेच्या प्रगतीबद्दल आणि तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल स्पष्टता देते.


घरकुल यादी २०२५ मध्ये तुमचे नाव कसे तपासायचे? (सोपी प्रक्रिया)

तुमचे नाव घरकुल यादीत आहे का हे तपासण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील:

  1. वेबसाइटवर जा: सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या (Pradhan Mantri Awas Yojana Gramin – PMAY-G) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  2. https://pmayg.nic.in
  3. रिपोर्ट विभाग निवडा: वेबसाइटवर गेल्यानंतर, ‘आवास सॉफ्ट’ (AwaasSoft) या पर्यायाखालील ‘रिपोर्ट’ (Report) विभागावर क्लिक करा.
  4. लाभार्थी तपशील पर्याय: त्यानंतर, तुम्हाला ‘बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन’ (Beneficiary Details for Verification) हा पर्याय निवडायचा आहे.
  5. माहिती भरा: आता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल. यामध्ये तुम्हाला खालील माहिती निवडावी लागेल:
    • तुमचा जिल्हा (District)
    • तुमचा तालुका (Taluka)
    • तुमच्या गावाचे नाव (Village Name)
    • २०२४-२०२५ हे आर्थिक वर्ष (Financial Year)
    • ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ हा पर्याय निवडा.
  6. कॅप्चा आणि सबमिट: विचारलेला कॅप्चा (Captcha) योग्यरित्या भरा आणि ‘सबमिट’ (Submit) बटणावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमच्या गावातील किती लोकांची नावे आहेत आणि कोणाला किती पैसे मिळाले आहेत, ही सर्व माहिती सहजपणे पाहू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan

या सुविधेमुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती तपासणे अधिक सोपे झाले आहे. नियमितपणे यादी तपासत रहा आणि योजनेच्या लाभापासून वंचित राहू नका!


तुमच्या मनात घरकुल योजनेबद्दल अजून काही प्रश्न आहेत का? कमेंट्समध्ये नक्की विचारा!

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ₹१० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळत आहे: असा करा ऑनलाईन अर्ज! Bank Of Maharashtra Personal Loan

Leave a Comment