Gold rate : सोन्याच्या किंमतीत अलीकडे मोठ्या वाढीनंतर आता मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत सोन्याने उच्चांक गाठलेला होता, मात्र आता त्यात जवळपास 3 टक्क्यांची घट झालेली आहेत. यामुळे सोन्याच्या सतत वाढणाऱ्या दरांच्या मालिकेला ब्रेक लागला आहे.
एक आठवड्याचा फायदा एका दिवसात झाला साफ
आताच सोन्याच्या दरात 3% पेक्षा अधिक घसरण झालेली आहे. या घसरणीमुळे संपूर्ण आठवड्याचा नफा एका दिवसात निघून गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली असून, अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहेत. परिणामी, अनेकांनी नफा घेण्यासाठी सोनं विकायला सुरुवात केलेली आहेत.
स्पॉट गोल्ड आणि फ्युचर्समध्येही घसरण
स्पॉट गोल्डमध्ये 2.6% इतकी घसरण नोंदवली गेलेली असून किंमत 3,030.66 डॉलर प्रति औंस इतकी झालेली आहेत. शुक्रवारी ही किंमत 3,016.49 डॉलरवर आलेली, जी गुरुवारी 3,167.57 डॉलरच्या उच्चांकावर होती. युएस गोल्ड फ्युचर्सदेखील 2.3% नी घसरून 3,049.20 डॉलरवर आलेले आहेत.
भारतीय बाजारातही किंमतीत मोठी घट
भारतामध्येही सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहेत. दिल्लीमध्ये मंगळवारी सोनं 87,600 रुपयांवर आलं असून, हे दर एका दिवसात 3,000 रुपयांनी कमी झालेले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलेला आहे.
Gold rate
सोन्याच्या भावात मोठी घसरण; येथे युट्युब व्हिडिओ पाहू शकता
घसरणीचं कारण काय? एक्सपर्ट्स काय सांगतात
स्टँडर्ड चार्टर्डच्या विश्लेषक सुकी कूपर यांच्या मते, सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ही घसरण झालेली आहेत. गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी विक्री करत आहे. सिटी इंडेक्सचे वरिष्ठ विश्लेषक मॅट सिम्पसन यांचं मत आहेत की, सध्याची घसरण तात्पुरती असून सोने भविष्यामध्ये पुन्हा तेजीत येईल.
अमेरिका-चीन संघर्षाचा परिणाम
ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीनने एकमेकांवर टॅरिफ लावलेले आहेत. यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून, याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झालेला आहे.
पुढे किती घसरण शक्य?
विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याच्या दरात सुमारे 38% पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र, दुसरीकडे शेअर बाजारात अस्थिरता असल्यामुळे सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यताही नाकारता येत नाहीत.