Havaman Andaj: राज्यातील या भागात 14 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

By Bhimraj Pikwane

Updated on:

Havaman Andaj

Havaman Andaj: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील वातावरण बदलत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढत असतानाच, हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत भारताच्या मध्य आणि पूर्व भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Havaman Andaj: राज्यातील या भागात 14 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा

हवामान अंदाजानुसार राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यानंतर मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला तर विदर्भाच्या काही भागात जोरदार गारपीट व सोसाट्याचा वारा वाहू लागला. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत शनिवारी पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळीला शनिवारी दुपारी वादळी वाऱ्याने झोडपले.

Havaman Andaj: आज कुठे पाऊस पडेल?

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यापैकी जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, बीड, नांदेड, लातूर आदी भागात हलका पाऊस पडू शकतो. Punjab Dakh Havaman Andaj

विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. इतर काही भागात हलका पाऊस अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

पुणे हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर यांनी आजच्या हवामान अंदाजाची माहिती सोशल मीडियावर जाहीर केली. त्यांच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर जिल्हे मध्यम स्वरूपाचे असतील. जालना, हिंगोली, परभणी येथे हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “Havaman Andaj: राज्यातील या भागात 14 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा”

Leave a Comment