पुढील काही तासांत आणि रात्री विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधारेचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाडा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा ‘यल्लो अलर्ट’ हवामान खात्याने दिलेला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे.
विदर्भातील हवामान अंदाज:
- रेड अलर्ट: विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधारेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे.
- ऑरेंज अलर्ट: अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहेत.
- मध्यम ते जोरदार पाऊस: यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत.
मराठवाड्यातील हवामान अंदाज:
- मध्यम ते जोरदार पाऊस: जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहेत.
- हलका ते मध्यम पाऊस: बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील हवामान अंदाज:
- मध्यम ते जोरदार पाऊस: नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहेत.
मध्य महाराष्ट्रातील हवामान अंदाज:
- हलका पाऊस: सोलापूर, सांगली, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहेत.
- घाटमाथ्यावर मुसळधार: पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील भागात मुसळधारेचा ‘यल्लो अलर्ट’ कायम आहे.
कोकणातील हवामान अंदाज:
- मुसळधार पाऊस: कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी ‘यल्लो अलर्ट’ जारी करण्यात आला आहेत.
पुढील ३ दिवसांचा अंदाज:
पुढील तीन दिवस विदर्भातील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, उद्यापासून (११ जुलै २०२५ पासून) मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोरडे हवामान राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहेत.