IMD Rain Alert Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे! ज्येष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी येत्या काही दिवसांतील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज जाहीर केलेला आहे. जुलै महिना अर्धा उलटला असला तरी, अनेक ठिकाणी पावसाने अजूनही अपेक्षित हजेरी लावलेली नाहीत. अशा स्थितीत, पुढील आठवड्यात पाऊस कसा राहील आणि कोणत्या भागांत पावसाचा जोर वाढणार, याबाबत सविस्तर माहिती पाहूयात.
हवेचा दाब कमी होणार, पावसाचे प्रमाण वाढणार!
रामचंद्र साबळे यांच्या विश्लेषणानुसार, महाराष्ट्रावर हवेच्या दाबातील बदलामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम होणार आहे.
- २० ते २३ जुलै (आजपासून बुधवारपर्यंत): या कालावधीत महाराष्ट्रावर १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहणार आहे. यामुळे, राज्याच्या उत्तरेकडील भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या मध्य भाग ते दक्षिण भागात पावसाचे प्रमाण साधारणच राहण्याची शक्यता आहेत.
- २४ ते २६ जुलै (गुरुवार ते शनिवार): हा कालावधी महत्त्वाचा आहे! या तीन दिवसांत महाराष्ट्राच्या उत्तर भागावर हवेचे दाब आणखी कमी होऊन १००० हेप्टापास्कलपर्यंत, तर मध्य भागावर १००२ हेप्टापास्कलपर्यंत येण्याची शक्यता आहे. हवेचा दाब कमी झाल्यामुळे पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता साबळे सरांनी वर्तवली आहेत.
वाऱ्याच्या दिशेत बदल आणि पावसाच्या वितरणावर परिणाम

या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेतही बदल होत आहे. कोकण वगळता, उर्वरित महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून (उत्तर-पश्चिम) राहील. वाऱ्याच्या या बदलाचा पावसाच्या वितरणावर थेट परिणाम होईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहण्याची अपेक्षा आहे.
हवामान बदलाच्या प्रभावाने वाऱ्याची दिशा बदलून पावसाच्या वितरणावर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. याचा विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांतील पावसाच्या वितरणावर परिणाम झाला आहे.
जुलैमध्येही पावसाची तूट: सद्यस्थिती
रामचंद्र साबळे यांनी सद्यस्थितीवरही प्रकाश टाकला आहे. जुलै महिना हा महाराष्ट्रात जास्त पावसाचा महिना मानला जातो. मात्र, या वर्षी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि यवतमाळ या जिल्ह्यांत केवळ सरासरी इतका पाऊस झाला आहे. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे, आगामी काळात पावसाचा जोर वाढणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बाब ठरू शकते.
या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आपली कामे आणि प्रवास यांचे नियोजन करावे.