किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे: संपूर्ण माहिती, फायदे आणि अर्ज प्रक्रिया पहा Kisan Credit Card

शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आणली आहे! आज आपण किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) म्हणजे काय, ते कसे मिळवायचे, त्याचे फायदे काय आहेत? आणि अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि भारत सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, आणि त्यापैकीच एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड ( Kisan Credit Card ) योजना.

Kisan Credit Card


क्रेडिट म्हणजे काय?

सुरुवातीला ‘क्रेडिट’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. क्रेडिट म्हणजे ‘पत’, ‘विश्वास’ किंवा ‘प्रतिष्ठा’. उदाहरणार्थ, जेव्हा एखादा दुकानदार तुमच्या विश्वासावर तुम्हाला उधार वस्तू देतो, कारण त्याला माहित आहे की तुम्ही पैसे वेळेवर परत कराल, यालाच क्रेडिट म्हणतात.

सध्याच्या डिजिटल युगात क्रेडिट कार्ड (Credit Card) खूप उपयुक्त ठरले आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडून तुम्हाला मिळणारी एक विशेष सुविधा. या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारचं ‘कर्ज’ बँकेने दिलेलं असतं. त्यामुळे तुमच्याकडे लगेच पैसे नसले तरी, तुम्ही वस्तू खरेदी करू शकता किंवा पेमेंट करू शकता. बँक तुमच्या वतीने पैसे देते आणि त्यानंतर तुम्ही ठराविक काळात व्याजासह ती रक्कम बँकेला परत करता. क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही ऑनलाइन खरेदी किंवा इतर ऑनलाइन पेमेंटसाठीही करू शकता.


किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Marathi)

किसान क्रेडिट कार्ड योजना भारत सरकार, नाबार्ड (NABARD) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्यामार्फत १९९८ साली सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे.

KCC योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना उत्पन्न वाढवता येते. ‘पंतप्रधान किसान क्रेडिट कार्ड योजना’ अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना ₹३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज फक्त ४% व्याजदराने दिले जाते, जर त्यांनी ते वेळेवर परतफेड केले.


किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश ( Kisan Credit Card )

आपल्या देशातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अजूनही चांगली नाही. शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना अनेकदा पैशांची गरज भासते. निधीअभावी शेतकरी अपेक्षित उत्पन्न मिळवू शकत नाहीत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना शेतीत मदत करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

या गाडी चालकांना बसणार 25,000 हजार रुपयांचा दंड; पहा नवीन नियम! RTO Vehicle Chalan
  • शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी कमी वेळात कर्ज उपलब्ध करून देणे.
  • पिकाच्या काढणीनंतरच्या खर्चासाठी आर्थिक साहाय्य करणे.
  • शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे.
  • शेतातील मालमत्तेच्या देखभालीसाठी तसेच दुग्धजन्य प्राणी, मत्स्यपालन, फलोत्पादन, फुलशेती इत्यादींसाठी आवश्यक खेळते भांडवल पुरवणे.
  • फवारणी, पंपसंच, पशुधन खरेदी यांसारख्या विविध कृषी व्यवसायांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज देणे.Kisan Credit Card
  • प्राणी, पक्षी, मासे अशा अनेक जलचरांचे संगोपन आणि मत्स्यपालनासाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करणे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे ( Kisan Credit Card Benifits)

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात:

  • कमी व्याजदर: या योजनेमार्फत शेतकऱ्यांना बँकेकडून फक्त ४% व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
  • व्याजदरात सवलत: जर शेतकऱ्यांनी ५ वर्षांच्या कालावधीत वेळेवर घेतलेल्या कर्जाची परतफेड केली, तर त्यांना २% व्याजदरात सवलत मिळते.
  • ₹३ लाखांपर्यंत कर्ज: भारत सरकार शेतकऱ्यांसाठी कमी व्याजात ₹३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते.
  • जलद कर्ज उपलब्धता: शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, प्रक्रिया सोपी असते.
  • अनेक गरजांसाठी उपयोग: शेतीसाठी, वैयक्तिक खर्चासाठी, मुलांचे शिक्षण किंवा लग्न अशा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी KCC चा उपयोग करू शकतात.
  • कर्जबाजारी होण्यापासून बचाव: ही योजना शेतकऱ्याला अनौपचारिक सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्यापासून वाचवते.
  • पूरक व्यवसायांना प्रोत्साहन: शेतीशिवाय पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन असे अनेक पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळते, ज्यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो.
  • खाद्य आणि वैद्यकीय खर्च: पशुधन खाद्य, पशु आहार आणि त्यांच्या चिकित्सेवरील खर्चासाठीही कर्जपुरवठा केला जातो.
  • विमा संरक्षण: योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू झाला असेल, त्यांना ₹५०,००० पर्यंत विमा संरक्षण दिले जाते, तर इतर जोखमींसाठी ₹२५,००० चे कव्हर मिळते.
  • बचत खाते आणि स्मार्ट कार्ड: पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्डसह कमी व्याजदराचे बचत खाते दिले जाते.
  • परतफेड न केल्यास: जर शेतकऱ्यांनी एका वर्षात कर्जाची परतफेड केली नाही, तर त्यांना व्याजदर ७% भरावा लागतो.

KCC अपघात विमा (KCC Accident Insurance)

व्यक्तिगत अपघात विमा योजना (Personal Accident Insurance Scheme) अंतर्गत बँकेकडून क्रेडिट कार्ड धारकांसाठी विमा काढला जातो. या विम्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • अपघाती मृत्यू: शेतकरी बंधूंच्या अपघाती मृत्यू झाल्यास ₹५०,००० पर्यंत विमा दिला जातो.
  • प्रीमियम: शेतकरी बंधूंना फक्त ₹५ प्रीमियम भरायचा आहे आणि उर्वरित ₹१० प्रीमियम बँक भरते.
  • ३ वर्षांचा प्रीमियम: शेतकरी बंधूंना ३ वर्षांमध्ये फक्त ₹१५ प्रीमियम जमा करायचा आहे.
  • वयाची अट: किसान क्रेडिट कार्ड अपघात विमा ७० वर्षे वयापर्यंतच्या शेतकरी मित्रांसाठी आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता ( Kisan Credit Card Elegibility)

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • जमिनीची मालकी: शेती स्वतः शेतकऱ्याच्या मालकीची असावी.
  • वयाची अट: शेतकरी बंधूचे वय १८ ते ७५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • पीएम किसान लाभार्थी: शेतकरी बंधू हा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असेल, तर त्यांनाही या योजनेसाठी पात्र ठरवले जाईल.
  • इतर व्यवसाय: मत्स्यपालन, पशुपालन यांसारख्या बिगरशेती व्यवसायांशी संबंधित किंवा पिकांच्या उत्पादनात संबंधित असलेले शेतकरीही पात्र आहेत.

किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत:

  • ओळखीचा पुरावा: पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी.
  • पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल (या पुराव्यांमध्ये अर्जदाराचा सध्याचा पत्ता असणे आवश्यक आहे).
  • शेतीची कागदपत्रे: उदा. ७/१२ उतारा आणि ८ अ.
  • शपथपत्र: दुसऱ्या बँकेत कर्ज घेतले नसल्याचा पुरावा म्हणून शपथपत्र.
  • पासपोर्ट आकाराची फोटो: अर्जदाराचे अलिकडील पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • बँकेचे पासबुक प्रत: बँक खात्याच्या पासबुकची प्रत.
  • मोबाईल क्रमांक: (आधार कार्डला लिंक केलेला असावा).

Kisan Credit Card Apply Process


किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे? (ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया)

तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीचा वापर करू शकता.

१. ऑफलाइन पद्धत:

बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे लोन ते ही कागदपत्र शिवाय; फक्त 2 मिनिटांत Bank of Maharashtra Personal Loan
  • ही एक सोपी पद्धत आहे. तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करू शकता.
  • तुम्हाला तुमच्या जवळील बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डचा अर्ज मागावा लागेल.
  • त्यानंतर लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करायची आहेत.
  • अर्ज करत असताना तुमचे पीएम किसान योजनेअंतर्गत बँक खाते असणे आवश्यक आहे.

२. ऑनलाइन पद्धत (PM Kisan अधिकृत वेबसाइटद्वारे):

  • सर्वप्रथम: जवळील सामान्य सेवा केंद्रात (Common Service Center – CSC) जावे लागेल.
  • कागदपत्रे: किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा.
  • ऑनलाइन अर्ज: सेवा केंद्रावर गेल्यावर तुमचा ऑनलाइन अर्ज भरला जातो.
  • बँकेच्या वेबसाइटवरून: किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी ज्या बँकेत अर्ज करायचा आहे, त्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ‘किसान क्रेडिट कार्ड’ पर्याय निवडावा.
  • अर्ज भरा: ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म भरावा लागेल. आवश्यक तपशील सह सर्व माहिती भरून ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
  • संदेश/पावती: फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला संदर्भ क्रमांक (Reference Number) मिळेल किंवा मेसेज केला जाईल.
  • बँकेत जमा करा: फॉर्म भरल्यानंतर मिळालेली पावती कागदपत्रांच्या सोबत तुम्हाला बँकेमध्ये जमा करावी लागते.
  • मंजुरी: तुम्ही जर किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र असाल, तर तुम्हाला १५ दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

पीएम किसान क्रेडिट कार्ड अधिकृत वेबसाईट:

Kisan Credit Card


किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत अर्ज करण्याची प्रक्रिया

तुम्हाला थेट बँकेच्या वेबसाइटवरून अर्ज करायचा असल्यास, खालील प्रक्रिया फॉलो करा:

  1. सर्वप्रथम तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट द्यावी लागेल.
  2. वेबसाइट ओपन झाल्यावर होम पेज दिसेल.
  3. मुख्यपृष्ठावर तुम्हाला ‘किसान क्रेडिट कार्ड फॉर्म’ चा पर्याय निवडायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
  4. त्यानंतर तुम्हाला ‘Apply Now’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  5. त्यानंतर राज्याचा पर्याय तुमच्यासमोर उघडेल.
  6. त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी सारखी अर्जामध्ये विचारलेली अचूक माहिती भरायची आहे.
  7. त्यानंतर योजनेच्या संबंधित सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  8. कागदपत्रे अपलोड झाल्यावर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करायचे आहे.
  9. अशा पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता. Kisan Credit Card

किसान कार्डसाठी किती जमिनीची आवश्यकता आहे का?

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्जदार सर्वप्रथम शेतकरी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, शेती स्वतःच्या मालकीची असावी. साधारणपणे, किमान १ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू होते. अशा शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असणे महत्त्वाचे आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेमार्फत शेतकऱ्यांना ₹३०,००० ते ₹३ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.

फक्त गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा काढा Land Record

आता १-२ गुंठे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय Land Record

भारतामध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना राबवणाऱ्या प्रमुख बँका

भारतातील अनेक प्रमुख बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवतात. काही प्रमुख बँकांची यादी खालीलप्रमाणे आहे:

  • अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड
  • आंध्रा बँक – ए बी किसान ग्रीन कार्ड
  • बँक ऑफ बडोदा – किसान समाधान कार्ड
  • बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
  • ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएंटल ग्रीन कार्ड
  • पंजाब नॅशनल बँक – पी एन बी कृषी कार्ड
  • स्टेट बँक ऑफ इंडिया – किसान क्रेडिट कार्ड
  • एचडीएफसी बँक – किसान क्रेडिट कार्ड
  • ॲक्सिस बँक – किसान क्रेडिट कार्ड
  • कॅनरा बँक – किसान क्रेडिट कार्ड
  • कॉर्पोरेशन बँक – किसान क्रेडिट कार्ड
  • सिंडिकेट बँक – SKCC
  • विजया बँक – विजया किसान कार्ड

याव्यतिरिक्त, तुमच्या जिल्हास्तरीय सहकारी बँकेत सुद्धा ही योजना राबवली जाते, परंतु काही राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा सहकारी बँकेतील किसान क्रेडिट कार्ड कर्जाची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते.


किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची किंवा बंद कार्ड पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया

जर तुम्हाला तुमच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची असेल किंवा बंद पडलेले कार्ड पुन्हा सुरू करायचे असेल, तर खालील प्रक्रिया फॉलो करा:

  1. सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन क्लिक करा.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
  3. त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ (Farmers Corner) वर जा.
  4. फार्मर्स कॉर्नर‘ वर गेल्यानंतर KCC फॉर्मल वर क्लिक करा.
  5. आता तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
  6. फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट आउट (hard copy) घ्या.
  7. त्यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह भरलेला फॉर्म तुमच्या जवळील बँकेत जमा करायचे आहे.
  8. या पद्धतीने तुम्ही किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकता किंवा बंद झालेले कार्ड पुन्हा सुरू करू शकता.

किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर

शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल इतर कोणतीही माहिती विचारण्यासाठी किंवा शंका निरसनासाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर 011-24300606 वर कॉल करू शकता.

थोडक्यात माहिती: किसान क्रेडिट कार्ड योजना

वैशिष्ट्यमाहिती
योजनाकिसान क्रेडिट कार्ड (KCC)
कोणी सुरू केलीभारत सरकार (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने)
सुरू होण्याचे वर्ष१९९८
लाभार्थीभारतातील शेतकरी
उद्देशशेतकऱ्यांना पिकांच्या लागवडीसाठी आणि इतर कृषी व संबंधित गरजांसाठी कमी वेळात कर्ज देणे.
विभागकृषी आणि शेतकरी कल्याण विभाग
किती कर्ज मिळते₹३ लाख पर्यंत (₹३ लाखांपेक्षा अधिक कर्ज घेतल्यास व्याजदर वाढू शकतो)
व्याज दर७% (वेळेवर परतफेड केल्यास ४% पर्यंत)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन/ऑफलाइन
श्रेणीकेंद्र सरकार योजना

Leave a Comment

Close Visit Marathinews360