Kusum Solar Yojana: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख सोलर पंप, कुसुम सोलर पंप योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्या

By Bhimraj Pikwane

Published on:

Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana: 2023 चालू आर्थिक वर्षामध्ये राज्य सरकार कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत राज्यांमध्ये 5 लाख शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत कृषी पंपाची वाटप करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारने व राज्य शासनाने मिळून कुसुम सोलर पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. शेतीसाठी सिंचन ही एक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गरज आहे. शेतीसाठी शासनाने भरपूर साऱ्या योजना आतापर्यंत आणले आहेत त्यापैकीच ही एक महत्त्वाची योजना आहे. कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर स्वर पंपाचे वाटप केले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रात्री अप रात्री शेतीला पाणी देण्याची गरज नाही. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी दिवसात सिंचन शेतीसाठी देऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये देखील वाढ व्हायला मदत होईल.

Kusum Solar Yojana
Kusum Solar Yojana

Kusum Solar Yojana: कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत किती अनुदान शेतकऱ्यांना मिळणार

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून 30 टक्के व राज्य शासनाकडून 30 टक्के तसेच इतर वित्तीय संस्थाकडून 30 टक्के अनुदान देण्यात येते. बाकी दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना सोयीच्या भरावी लागते. खुल्या प्रवर्गामधील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागते तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के रकमेचा भरणा करावा लागतो. Kusum Solar Yojana

कुसुम सोलर पंप योजनेच्या अटी पात्रता निकष

  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही अशा शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
  • विहीर, बोरवेल, शेततळे, नदी, नाले जो आपल्या शेजारी शेताच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे तेच शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व अटल सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या नसावा.
  • जर वरील या दोन्ही योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला असेल तर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी ते शेतकरी पात्र नसतील.

आवश्यक कागदपत्र

  • सातबारा उतारा ( ज्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असणे आवश्यक)
  • जर शेतकऱ्याचे सामायिक क्षेत्र असेल तर अशा वेळेस दोनशे रुपयांच्या बॉण्डवर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

कुसुम सोलर पंप योजनेच्या एचपी नुसार किमती

एचपी नुसार पंप ची किंमत जीएसटी सह

3 Hp पंप ची किंमत193803
5 Hp पंप किंमत269746
7.5 Hp पंप किंमत374402
solar pump price

शेतकऱ्यांनी भरावयाचा लाभार्थी हिस्सा 13.8% जीएसटी सह

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी भरावयाचा लाभार्थी हिस्सा खालील प्रमाणे

3 Hp पंपसाठी19380
5 Hp पंप साठी26975
7.5 Hp पंपसाठी37440

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जीएसटी सह भरावयाचा लाभार्थी हिस्सा खालील प्रमाणे

3 Hp पंपासाठी9690
5 Hp पंपसाठी13488
7.5 Hp पंपसाठी18720

Bhimraj Pikwane

https://mhshetkari.com I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi And https://mhshetkari.com. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “Kusum Solar Yojana: शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख सोलर पंप, कुसुम सोलर पंप योजनेविषयी सर्व माहिती जाणून घ्या”

Leave a Comment